Guru Ravidas Jayanti 2020 (Photo Credits: File Image)

Guru Ravidas 642nd Jayanti:  भारतवर्षात आजवर अनेक संत महात्मे जन्मले आहेत, या संतांच्या रांगेतील महत्वाचे नाव म्हणजे गुरु रविदास (Guru Ravidas), 1450 साली जन्मलेल्या रविदास यांची यंदा 642 वी जयंती आहे. हिंदू कालदर्शिकेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेला गुरु रविदासांचा जन्म झाला होता, त्यानुसार यंदा 9 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास यांची जयंती (Guru Ravidas Jayanti) तिथी आहे. याच निमित्ताने आज आपण त्यांचा संत बनण्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. वाराणसी मधील छोट्या गावात जन्म घेतलेला एक सर्वसामान्य व्यक्ती ते संत असा हा प्रवास फारच रोचक आहे. आपल्या आयुष्यात कोणासोबतही भेदभाव न करता सर्वांना प्रेम द्यावे अशी शिकवण देणाऱ्या गुरु रविदासांच्या आयुष्यातील एका छोट्याश्या घटनेची ही कथा आहे चला तर जाणून घेऊयात..

एका पौराणिक कथेनुसार, एकदा बालपणी रविदास आपल्या मित्रांसोबत खेळत होते, एक दिवस खेळल्यावर त्यांचा एक मित्र दुसऱ्या दिवशी खेळायला आला नाही, त्याच्या घरी विचारायला गेले असता त्याचे निधन झाल्याचे गुरुदास यांना समजले. अर्थात यामुळे त्यांना खूप वाईट वाटले. खिन्न होऊन रविदास त्या मृत शरीराजवळ बसून आपल्या मित्राला उठ आणि माझ्यासोबत खेळायला चल असे म्ह्णू लागले आणि आश्चर्य असे की त्यांनी हे शब्द उसाचहरताच तो मृत मित्र चक्क उभा राहून बोलायला लागला. या चमत्कारानंतर प्रत्येक जण थक्क झाला आणि यापुढे नेहमी त्यांना देवाचा दूत, अलौकिक शक्तिधारक म्ह्णून ओळखले जाऊ लागले. महत्वाची गोष्ट अशी की, यांनंतरही कधी त्यांनी स्वतःला देव मानून घेतले नाही उलट कृष्ण आणि राम भगवानाच्या भक्तीत त्यांनी आपले जीवन व्यतीत केले आणि नेहमीच प्रेम आणि सद्भावनेचा प्रसार केला.

दरम्यान, संत रविदास जयंतीच्या निमित्त त्यांचे अनुयायी पवित्र नदीत स्नान करतात. हा जयंती सोहळा एक मोठा उत्सव म्ह्णून साजरा केला जातो. रविदासांचे दोहे गात आणि भजन कीर्तन करत हा दिवस आजही साजरा केला जाणार आहे.