Guru Purnima 2021 Wishes | File Image

Guru Purnima 2021 Marathi Wishes: आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.' या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यास पौर्णिमा' असेही म्हटले जाते. यंदा गुरुपौर्णिमा शुक्रवार, 23 जुलै रोजी साजरी होणार आहे. या दिवशी मंदिरांमध्ये मोठा उत्सव असतो. तसंच विद्याभ्यासासह नृत्य, संगीत, चित्रकला यांसारख्या विविध कलांचे ज्ञान देणाऱ्या गुरुंची भेट घेऊन त्यांना वंदन करतात. यंदा कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणावर गुरु पौर्णिमा साजरी करता येणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे आपल्या गुरुंना शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचा दिवस खास करता येईल.

गुरुपौर्णिमे निमित्त मराठी Wishes, Messages, HD Images, Wallpapers, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन गुरुंना वंदन करा. (Happy Guru Purnima 2021 Messages: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Quotes, Wishes Facebook, WhtsApp द्वारा शेअर करून व्यक्त करा कृतज्ञता)

गुरुपौर्णिमा शुभेच्छा:

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..

आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Guru Purnima 2021 Wishes | File Image

गुरु म्हणजे परीस

आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima 2021 Wishes | File Image

गुरु जगाची माऊली

जणू सुखाची सावली

गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

Guru Purnima 2021 Wishes | File Image

गुरु हा संतकुळीचा राजा

गुरु हा प्राणविसावा माझा

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima 2021 Wishes | File Image

मनी शुद्ध भाव, उत्कट प्रेम,

ऐसे गुरु करु प्रथम नमन!

गुरुपौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima 2021 Wishes | File Image

आपल्या संस्कृतीला गुरु-शिष्याची मोठी परंपरा असून गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलं आहे. तसंच आईला प्रथम गुरु मानले गेले आहे. त्याचबरोबर ग्रंथ, पुस्तके यांनाही गुरुंचा दर्जा आहे. आपल्याला ज्ञानार्जन करणारी, मार्ग दाखवणारी व्यक्ती, पुस्तक गुरुस्थानी मानावे.