Sai Baba (Photo Credits: Shirdi Saibaba Sansthan Facebook)

आज, 5 जुलै रोजी गुरु पौर्णिमा (Guru Purnima 2020)  साजरी केली जात आहे. दरवर्षी या निमित्त शिर्डी (Shirdi)  येथील साईबाबा मंदिर संस्थानाच्या (Sai Mandir Sansthan) वतीने मोठा उत्सव आयोजित केला जातो. अनेक साईभक्त सुद्धा या कालावधी शिर्डीला जातात. यंदा कोरोना (Coronavirus) मुळे आपल्याला ना शिर्डीला जाणे शक्य होणार आहे ना हा उत्सव पाहणे. मात्र त्यासाठी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. तुम्ही शिर्डीच्या साईबाबांचे लाईव्ह दर्शन घेऊ शकाल अशी खास सोय करण्यात आली आहे. आज गुरुपौर्णिमा विशेष, काकड आरती झाल्यापासून यूट्यूबच्या माध्यमातून शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे लाईव्ह दाखवण्यात येत आहे. यापद्धतीने तुम्ही सुद्धा आज दर्शन घेऊन तुमच्या दिवसाची सुरुवात आणि एकूणच दिवस खास करू शकता. Happy Guru Purnima 2020 Messages: गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून माना गुरूंचे आभार!

यंदा राज्यावर कोरोनाचे सावट असताना शिर्डी संस्थानाच्या वतीने हा उत्सव अत्यंत साधेपणाने आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्याचे ठरवलेले आहे. गुरू पौर्णिमेदिवशी साई मंदिर संस्थान कडून गुरू पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी रक्तदान (Blood Donation) आणि प्लाझ्मा दान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जुलै रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत श्री साईआश्रम मध्ये 1हजार रुम येथे भव्‍य रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.Guru Purnima 2020 Marathi Songs: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबांची 'ही' खास मराठी गाणी आणि भजने (Watch Video)

शिर्डी साईबाबा मंदिर गुरु पौर्णिमा लाईव्ह दर्शन

दरम्यान, 17 मार्च पासूनच श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आहे. गुरू पौर्णिमा दिनी यंदा पहिल्यांदाच भाविकांना प्रवेश बंदी असेल.