Gudi Padwa HD Images (PC - File Image)

गुढी पाडवा (Gudi Padwa) हा मराठी अस्मिता जपणार्‍यांसाठी एक महत्त्वाचा सण आहे. मराठी महिन्यांमधील पहिला महिना चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा हिंदू धर्मियांसाठी हिंदू आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतात. चैत्र मासारंभ (Chaitra Maas Aarambh) भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात ओळखला जातो. यामध्ये महाराष्ट्रात हा चैत्रमासारंभ गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा गुढीपाडवा आहे. पण यंदा हा पाडवा ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार 29 की 30 मार्चला साजरा होणार? असा तुम्हांला प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या गुढी पाडवा यंदा यंदा कधी साजरा होणार आहे?

गुढी पाडवा यंदा कधी साजरा होणार?

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढी पाडवा यंदा 30 मार्च 2025 दिवशी साजरा होणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेची सुरूवात 29 मार्चला संध्याकाळी 4.28 ला होणार असून समाप्ती 30 मार्चला दुपारी 12.50 ला होणार आहे.  यामध्ये  उदय तिथीनुसार सण साजरा करण्याची रीत असल्याने 30 मार्चला चैत्र पाडवा साजरा केला जाणार आहे. यंदाचा पाडवा म्हणजे शालिवाहन शके 1947 ची सुरूवात आहे. चैत्र नवरात्र देखील 30 मार्च पासूनच सुरू होणार आहे.  नक्की वाचा: Swami Samarth Prakat Din Date: यंदा 31 मार्चला साजरा होणार स्वामी समर्थ प्रकट दिन.  

भारतामधील चैत्रमासारंभाचं स्वागत कोणत्या सणांनी होते?

चैत्रमासारंभ महाराष्ट्रात जसा गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो तसा तो  कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील उगादी, पंजाब आणि इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये बैसाखी, पश्चिम बंगालमध्ये पोहेला वैशाख, गुजरातमध्ये बेस्टु वरस, तामिळनाडू मध्ये पुथंडू, केरळमध्ये विशू, सिक्कीम मध्ये लोसूंग आसाम मध्ये बोहाग बिहू आणि  काश्मीरमध्ये नवरेह म्हणून साजरा केला जाईल.  नक्की वाचा:  गुढी पाडवा निमित्त सहज सोप्या रांगोळ्या दारात काढून करा नवं वर्ष साजर. 

पौराणिक कथेनुसार, ब्रम्हदेवाने चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशीच सृष्टीची निर्मिती केली अशी धारणा आहे.  प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करुन अयोध्येत प्रवेश केला तेव्हा विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली गेली. असे मानले जाते. सोबतच गुढीपाडव्याच्या दिवशीच सम्राट शालिवाहनाने हूणांचा पराभव करुन आपले राज्य स्थापन करुन शालिवाहन शक सुरु केले. त्यामुळे गुढी पाडव्याला घरावर गुढी उभारण्याची पद्धत आहे.