Swami Samarth | (File Image)

चैत्र शुद्ध द्वितीयेचा दिवस हा स्वामी समर्थांचा प्रकट दिन (Swami Samarth Prakat Din) म्हणून पाळला जातो. यंदा हा दिवस 31 मार्च 2025 दिवशी आहे. स्वामी भक्तांच्या माहितीनुसार, 1856 मध्ये मंगळवेढ्यातून स्वामी समर्थ पहिल्यांदा अक्कलकोट (Akkalkot) मध्ये आले. गावातील खंडोबा मंदिरामध्ये ते राहिले हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीयेचा असल्याने या दिवशी स्वामी भक्त स्वामी समर्थांची जयंती किंवा प्रकट दिन साजरा करतात.

स्वामी समर्थांना  श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते. अक्कलकोट मधील संत परंपरेतील ते एक थोर संत मानले जातात. दरम्यान स्वामी भक्त या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोट मध्ये मोठा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात विविध मठांमध्ये या प्रकटदिनाच्या निमित्ताने सप्ताहांचे, विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (वाचा - स्वामी समर्थ प्रकट दिन : अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!).

स्वामी समर्थांनी आपल्या अवतारकार्यामध्ये अनेक लीला केल्याचा त्यांच्या भक्तांचे अनुभव आहेत. दांभिकपणा, अंधश्रद्धा यांना दूर सारून अनेकांनी त्यांना सन्मार्गाला लावले. आपला शिष्यवर्ग घडवला. आजही स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत अनेक ठिकाणी त्यांचे भक्त गुरुलीलामृत, स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करतात. Swami Samartha Prakat Din: जाणून घ्या ऑन स्क्रिन स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारा अक्षय मुडावदकर बद्दल काही गोष्टी! 

स्वामी भक्तांच्या धारणेनुसार, त्यांनी 30 एप्रिल 1878 मध्ये म्हणजे चैत्र वद्य त्रयोदशीला अक्कलकोट मध्ये वटवृक्ष समाधी मठ या ठिकाणी मध्यान्ह्याच्या वेळी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. स्वामींचे शिष्य चोळप्पा यांच्या घराजवळ त्यांना समाधीस्थ करण्यात आल्याचं सांगितले जाते.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून लेटेस्टली मराठीचा कोणत्याही अंधश्रद्धा पसवण्याचा मानस नाही. यामधील कोणत्याही गोष्टीची आम्ही पुष्टी करत नाही.