Gudi Padwa 2019: वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील लोक नववर्ष म्हणून साजरा करतात.चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण प्रथम सकाळी सूर्योदयापूर्वी मुखशुद्धी नंतर कडुलिंबाचे पान तोंडात चघळतो. आज पाडव्याच्या दिवशी घरात गुढी उभारुन त्याची पूजा केली जाते. तसेच दरवाज्याला आंब्यांच्या पानांचे तोरण लावून घराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढली जाते.
प्रभु श्रीराम यांनी चौदा वर्षांचा वनवास पूर्ण केला तो याच दिवशी. म्हणून विजयाची गुढी उभारुन आनंद व्यक्त केला जातो. तर गुढीपाडव्यामधील शब्दांचा अर्थ म्हणजे विजयाचा पताका आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा असा होतो. आज ही गुढीपाडव्याचा सण हा हिंदू धर्मियांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्या घरासमोर काढल्याने या सणाची शान अधिकच वाढलेली दिसून येते. तर पाहूयात गुढी पाडव्यासाठी खास सोप्या पद्धतीची रांगोळी कशी काढाल.(हेही वाचा-Happy Gudi Padwa 2019: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी-इंग्रजी SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, Images, Greetings!)
पाडव्याच्या निमित्ताने नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण या सारख्या गोष्टी केल्या जातात. तसेच या दिवशी गरुजू लोकांना दान दिल्याने पितर संतुष्ट होतात.तर हा दिवस सुख-समाधानाने, आंनदी वातावरणात, मंगल गीते, वाद्ये, कथा ऐकत घालवावा. यंदाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!!!