Persian New Year 2023: गूगल मुखपृष्ठ म्हणजेच गूगल होम पेज ओपन होताच आज आपल्याला रंगीबेरंगी फुलांनी सजलेले एक डूडल (Google Doodle on March 21) दिसेल. होय, आजचा दिवस वेगळ्या अर्थाने खास असल्याने गूगल डूडल द्वारे ही नैसर्गिक रंगाची उधळण करण्यात आली आहे. आज 21 मार्च, म्हणजेच पार्शियन नववर्ष सुरु होण्याचा पिहिला दिवस. या दिवसाला नौरोज (Google Doodle Celebrates Nowruz 2023)असेही म्हणतात.
गूगल डूडल आज पर्शियन नववर्षाच्या निमित्ताने फुलांच्या आणि रंगीबेरंगी चित्राद्वारे चिन्हांकित करत आहे. पार्शियन नववर्षाचा पहिला दिवस नऊरोज साजरा करताना गूगलने अधिकृत वेबसाइटवर, की नौरोज 2023 हिवाळ्याचा शेवट दर्शवितो. हा दिवस जगभरातील 300 दशलक्ष लोक साजरा करतात.
गूगल डूडलमध्ये आज पाहायला मिळते की, ट्यूलिप, हायसिंथ, डॅफोडिल्स अशी फुले आणि त्यावर बसणाऱ्या मधमाशा. ज्यामुळे आपणास अधिकृत वसंत ऋतु हंगामाची सुरुवात आणि हिवाळ्याचा शेवट सूचित होतो. (हेही वाचा, India's 74th Republic Day Google Doodle: भारतीय प्रजासत्ताक दिन 2023 गूगल डूडल तुम्ही पाहिले का? इंडिया गेट, परेड आणि बरंच काही पाहून व्हाल थक्क)
काय आहे नौरोझ? कोठे करतात साजरे?
नौरोझ हे पर्शियन नवीन वर्ष आहे. त्याला इराणी नवीन वर्ष म्हणून देखील ओळखले जाते. जे साधारणपणे 20 किंवा 21 मार्चच्या आसपास वसंत ऋतूमध्ये येते. हा दिवस अथवा सण इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, अझरबैजान आणि भारत आणि पाकिस्तानच्या काही भागांसह मध्य आशिया, मध्य पूर्व आणि त्यापलीकडे विविध समुदाय आणि देशांद्वारे साजरा केला जातो.
नौरोझ हा इराणमधील पूर्व-इस्लामिक धर्म झोरोस्ट्रियन धर्मात मूळ असलेला एक प्राचीन सण आहे आणि 3,000 वर्षांहून अधिक काळापासून साजरा केला जातो. हे नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूचा पहिला दिवस, नवीन सुरुवात, आशा आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे.