'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल
Happy Father's Day (Photo Credits: Google.Com)

Father's Day 2019 Google Doodle: आज 16 जून हा दिवस जगभरात फादर्स डे (Father's Day) म्हणून आज साजरा केला जाणार आहे. गुगलनेही जगभरातील 'बाप' माणसांना आज या दिवसाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी विशेष गुगल डुडल बनवलं आहे. गोंडस बदक आणि त्याच्या अवती भवती त्याची पिल्लावळ अशा अ‍ॅनिमेटेड स्वरूपात हे डुडल साकारण्यात आलं आहे. गुगलच्या मराठी होमपेज वर 'बाबांचा दिवस २०१९' अंतर्गत तुम्हांला ते पाहता येऊ शकतं. यामध्ये तीन वेगवेगळ्या अ‍ॅनिमेशनचावापर करून कुटुंबसंस्थेतील वडीलांच्या स्थानाला अधोरेखित करण्यात आलं आहे. जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. जगभरात देशापरत्वे हे सेलिब्रेशन वेगवेगळ्या दिवशी केलं जातं. मात्र यंदाचे 'फादर्स डे' चं औचित्य साधत जगभरात गुगलचे हे हटके डुडल होमपेज वर झळकत आहे. पितृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे!

वडील हे कळत नकळत घरातल्या प्रत्येकाच्या सुखासाठी झटत असतात. आपली संस्कृती पुरुषप्रधान असूनही त्याला मोकळेपणाने 'थँक्स' बोलून त्याच्या त्यागाचं कौतुक फार क्वचितच होतं. पण यंदा 'फादर्स डे' चं औचित्य साधून ही कसरही भरून काढा. जगभरातील वडिलांच्या पालकत्त्वाची जाणीव करून देणारा हा खास दिवस असतो. यंदा तुमच्या बाबांना 'फादर्स डे'ला खूष करण्यासाठी खास गिफ्ट आयडियाज!

आज विविध स्वरूपात 'फादर्स डे' साजरा होणार आहे. तुमच्या वडीलांसोबत या दिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही पण प्लॅन बनवला ना? आज तुमच्या वडिलांनाही सरप्राईज गिफ्ट देऊन खुश करा.