Father’s Day 2019 Wishes: पितृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे!
Father's Day 2019 (Photo Credits: File Photo)

International Father's Day 2019 Marathi Messages & Wishes: आईची महती तर अनेक कविता, निबंध, गीते, साहित्यातून गायली जाते. मात्र आयुष्यातील आधारस्तंभ असलेल्या आणि वेळोवेळी आपल्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या वडीलांबद्दल फारसे बोलले जात नाही. पण आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक तरी दिवस हवा आणि तो म्हणजे फादर्स डे. यंदा 16 जून 2019 रोजी फादर्स डे साजरा केला जाईल. तर फादर्स डे निमित्त वडीलांना शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे....

 

बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंत:करण

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

2

Fathers' Day Wishes (File Photo)

कोडकौतुक वेळप्रसंगी

धाकात ठेवी बाबा

शांत प्रेमळ कठोर

रागीट बहुरुपी बाबा

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

3

Fathers' Day Wishes (File Photo)

आई बाळाला ९ महिने पोटात सांभाळते

तर बाप बाळाला आयुष्यभर डोक्यात सांभाळतो

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

4

Fathers' Day Wishes (File Photo)

आपले दु:ख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा

एकमेव देवमाणूस म्हणजे वडील.

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

5

Fathers' Day Wishes (File Photo)

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…

जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,

तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,

तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,

आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

1

Fathers' Day Wishes (File Photo)

GIF's

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

शुभेच्छा संदेश व्हिडिओ:

 

आयुष्यभर आपल्यासाठी झटणाऱ्या वडीलांसाठी एक दिवस काढा. त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. त्यांची विचारपूस करा. त्यांच्यासोबत वेळ घालवा. एखादं छानसं गिफ्ट द्या किंवा ही शुभेच्छापत्रं शेअर करुन त्यांना खुश करा.