Father's Day 2019 Gift Ideas: बाबांचा दिवस खास बनवण्यासाठी तुमच्या बजेट मध्ये बसतील अशा काही हटके गिफ्ट आयडीयाज!
Happy Father's Day (Photo Credits: Pexels)

आज, 16 जून ला जगभरात 'फादर्स डे' (Father's Day) साजरा केला जात आहे. मुलांसाठी अनेक गोष्टींचा कळत नकळत त्याग करून त्यांना जे हवं ते मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या बाबांचं प्रेम नेहमीच गृहीत धरलं जातं. अनेकदा तर आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्थ होउन जातो की दिवसेंसदिवस वडिलांशी बोलणं सुद्धा होत नाही. पण मग निदान आज, फादर्स डे च्या निमित्ताने तरी एक दिवस बाबांसाठी काढून बघा.. जास्त काही नाहीच तर तुमच्या बजेट मध्ये बसेल त्याप्रमाणे एखादं छोटंसं गिफ्ट तुमच्या बाबांना देऊन बघा.. कारण ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यासाठी इतना तो बनता है ना बॉस!

चला तर मग पाहुयात यंदाच्या ट्रेंडिंग लिस्ट प्रमाणे तुमच्या बजेट मध्ये बसणारं आणि बाबांना आवडेल असं काय गिफ्ट देऊ शकाल...वडिलांच्या निस्सीम प्रेमाची, त्यागाची महती सांगणारी '5' उत्कृष्ट गाणी

बजेट ( 2 ते 5 हजार)

विकेंड ट्रीप

मुंबई, पुण्याच्या नजीक तुम्ही काही रिसॉर्ट्समध्ये एक दिवस नक्की तुमच्या वडिलांसोबत घालवू शकता. कायम पैसे बचतीचे तुम्हांला धडे देतादेता त्यांची फिरायची राहुन गेलेली एक जागा तुम्ही त्यांना 'विकेंड ट्रीप' म्हणून प्लॅन करून द्या.

स्मार्ट वॉच्स

आजकाल मधुमेह, रक्तदाबाच्या समस्या आणि हृद्याचे विकार हे अगदीच सामान्य झाले आहेत. तुमचे बाबा फीटनेस फ्रीक असतील तर या सार्‍यांची अगदी एका क्लिकवर जवळ राहील अशी अनेक स्मार्ट वॉचेस सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी एक त्यांना गिफ्ट करा

बजेट ( 1 ते 2 हजार)

ट्रॅव्हल / ग्रुमिंग कीट

कामाचा भाग म्हणून तुमच्या वडीलांना सतत प्रवास करावा लागत असेल तर किंवा अगदी सहजही तुम्ही त्यांना ट्रॅव्हल कीट गिफ्ट करू शकता. यामुळे गोष्टी ऑरगनाईज्ड स्वरूपात दिल्याने आयत्यावेळेस होणारी धावाधाव थोडी कमी होईल.

पॉवर बॅंक

प्रवासात अनेकदा मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नसल्यास पॉवर बॅंकचा मोठा आधार असतो.

बजेट (1 हजाराहून कमी)

कस्टमाईज्ट कार / बाईक किचेन

खास मेसेज लिहलेलं तुम्ही कस्टमाईज्ड कार किंवा बाईक किचन बनवून घेऊ शकता.

आवडत पुस्तक

आवडत्या लेखकांच्या पुस्तकांचा सेट तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेट नुसार तुमच्या वडिलांसाठी गिफ्टची निवड अजून चांगली करू शकता. मग आता काहीच दिवस उरलेत लवकर लागा शॉपिंगला!