Gold | File Image

Gold Silver Rate Today: दिवाळी मध्ये आज धनतेरसचा (Dhanteras) सण देशभर साजरा केला जात आहे. धन म्हणून लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करण्याचा आजचा दिवस आहे. पण या दिवाळीच्या सणामध्ये धनतेरस निमित्त अनेकजण सोन्याची खरेदी करतात. भारतीयांसाठी सोन्यात आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक देखील असते. त्यामुळे हिंदू सणांमध्ये काही महत्त्वाच्या दिवशी ऐपतीनुसार, लहान मोठ्या प्रमाणात का होईना पण सोनं खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. आज धनतेरसचा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी सोनं खरेदीला गर्दी केली आहे. मग पहा आज सोन्या-चांदीचा नेमका प्रति तोळा दर काय आहे?

सोन्या-चांदीचे दर 2024 मध्ये चढे राहिले आहेत. आज Good Returns च्या माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 7375 प्रति ग्राम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8045 रूपये प्रतिग्राम आहे. चांदीचा दर प्रति किलो 99,000 रूपये आहे. Dhanteras Gold and Silver Coin Delivery: सोने, चांदीची नाणी घरपोच, केवळ 10 मिनीटांत; Blinkit, BigBasket द्वारे डिलिव्हरी सेवा .

सोन्यात खरेदी करताना बिस्किटं, वळी ही 24 कॅरेट मध्ये खरेदी करता येतात. 24 कॅरेट म्हणजे शुद्ध 999 सोनं मानलं जातं पण त्यामध्ये दागिने बनवले जात नाहीत. दागिन्यांसाठी 23 कॅरेट, 22 कॅरेट आणि डायमंड असल्यास 18 कॅरेट सोन्यामध्ये ते बनवले जातात. यामध्ये सोन्याच्या किंमतीवर सराफा दुकानात घडणावळ आणि टॅक्स आकारला जातो. तसेच सोनं खरेदी आणि विक्री चा दर देखील वेगवेगळा असतो.

सोन्या-चांदीचे दर हे सतत वर खाली होत असतात. सोन्याची जगभरातील मागणी, चलनातील चढउतार, व्याजदर आणि सरकारी धोरणे यासारख्या अनेक घटकांनी ते प्रभावित होतात त्यामुळे त्याच्याच बदल होतात.