Gold Rate On Dussehra 2023: दसर्‍याच्या मुहूर्तावर सोनं, चांदी खरेदी करताय? जाणून आजचा दर
Gold | fille Image

दसरा (Dussehra) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी अनेकांची सोनं घेण्याची रीत आहे. दसर्‍याच्या निमित्ताने आपट्याची पानं देखील 'सोनं' म्हणून दिली आणि घेतली जातात. पण यंदा येत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आज दसर्‍याला सोनं घेण्याचा विचार करत असाल तर पहा आज सोन्याचा दर काय आहे? भारतीयांची सोनं खरेदी ही केवळ गुंतवणूक म्हणून नसून अनेकजण सोन्याचे दागदागिने नियमित घालण्यासाठी देखील विकत घेतात. मग आज सोन्याचे दागिने किंवा वळं, बिस्किटं यांच्या स्वरूपात सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर पहा आजचा सोन्याचा दर!

goodreturns वेबसाईटच्या माहितीनुसार, आज दसरा 24 ऑक्टोबरच्या दिवशी मुंबई मध्ये 24 कॅरेटचा सोन्याचा दर प्रतिग्राम 6145 रूपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा प्रतिग्राम 5635 आहे. हा सोन्याचा दर तुमच्या शहरानुसार आणि सराफाच्या दुकानात थोड्याफार फरकाने वर खाली असू शकतो. दरम्यान सोन्याचे दागिने करणार्‍यांना सोन्याच्या किंमतीवर घडणावळ आणि कर देखील भरावा लागणार आहे त्यामुळे त्यानुसार तुम्हांला दागिने विकत घ्यावे लागतील.

सोन्याप्रमाणेच अनेक जण चांदीची देखील खरेदी करतात. चांदी घेण्यासाठी आजचा प्रतिकिलोचा दर 75100 आहे. हा दर देखील तुमच्या शहर आणि सराफा नुसार कमी जास्त असू शकतो. नक्की वाचा: Happy Dussehra 2023 Wishes in Marathi: दसर्‍या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा सण विजयादशमीचा.

दसरा सणाचा मुहूर्त साधत सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी उसळत असते. त्यामुळे इतर दिवसाच्या तुलनेत या दिवशी सोन्याचा दर थोडा चढा असू शकतो. पण दर अधिकचा असेल तरीही आजच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी सराफा दुकानात सर्वत्रच ग्राहकांची मोठी रांग असते. मुंबईत सोमवार (23 ऑक्टोबर) दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सोने 62 हजार 400 रुपये होता. दसऱ्याला सोने 64 हजारांचा टप्पा पार करण्याचा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी वर्तवला होता. मागच्या वर्षी सोन्याचे भाव 63 हजारपर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं होतं. या तुलनेत आजचा सोन्याचा दर स्थिर आहे.

सरकारने आता गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्यासाठी लोकांची प्रत्यक्ष सोनं खरेदीची आणि त्यामधून ते सुरक्षित ठेवण्याची काळजी दूर करत सोव्हरिन गोल्ड पॉलिसी देखील जारी केली आहे.