Pandharpur Mandir | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रामध्ये 11 ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर आज गोपाळकालाचा दिवस आहे. दरम्यान भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णाने पृथ्वीवर श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी जन्म घेतला अशी हिंदू धर्मामध्ये अख्यायिका आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गोकुळाष्टमी निमित्त विठ्ठल- रूक्मिणीचे मंदिर आणि गाभारा झेंडू व अस्टरच्या फुलांनी सजवला आहे. पिवळ्या, नारंगी झेंडूमध्ये पांढर्‍या रंगाची अस्टरची फुलं अशी सजावट आहे. दरम्यान कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात अद्याप कुठलेच प्रार्थनास्थळ उघडलेले नाही. त्यामुळे विठ्ठल रूक्मिणीच्या देवळातही आज भक्तांविनाच नित्य पूजा करण्यात आली आहे.

पंढरपूरमध्ये महत्त्वाच्या सणाला आकर्षक फूलांची सजावट करण्याची पद्धत आहे. सणा-वाराच्या निमित्ताने आकर्षक सजावट करून आनंद द्विगुणित केला जातो. सध्या लॉकडाऊनमध्येही ही प्रथा मंदिर परिसरामध्ये कायम ठेवण्यात आली आहे. Krishna Janmashtami 2020: मथुरेच्या कृष्ण जन्मस्थान मंदिर ते देशभर इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

 

गोकुळाष्टमी निमित्त आकर्षक सजावट

कौरव -पांडवांच्या युद्धामध्ये कृष्णाने अर्जुनाला कर्तव्य आणि कर्म संबंधाने अमुल्य उपदेश केला होता. तो उपदेश भगवतगीता म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभरात भगवतगीता हा पवित्र ग्रंथांपैकी एक मानला जातो. त्याचं पूजन केले जातं. भगवतगीतेची शिकवण श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने जनमाणसांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने त्याचे पठण केले जाते.