Gatari Amavasya 2024 Wishes in Marathi: हिंदू धर्मातील लोकांसाठी श्रावण महिना अतिशय पवित्र समजला जातो. या महिन्यात लोक मांसाहार आणि मद्य सोडून सात्विक आहार घेतात. महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होण्याअगोदर गटारी अमावस्या (Gatari Amavasya 2024) साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी लोक भरपूर मांसाहार करतात. गटारी अमावस्येला लोक मांसाहार करतात. हा दिवस सणाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी मांसप्रेमी संपूर्ण नॉनव्हेज पदार्थ बनवून एकत्र मेजवानीचा आनंद घेतात.
यंदा 4 ऑगस्ट रोजी गटारी अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. गटारी अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यानंतर लोक मांसाहार, मद्यपान आणि कांदा, लसूण यांसारखे तामसिक पदार्थ वर्ज्य करतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच लोक मांसाहार करून सर्व प्रथा पाळण्याची तयारी करतात. हा दिवस महाराष्ट्रात गटारी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना खास गटारीच्या शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील WhatsApp Status, Facebook Messages द्वारा आपल्या मित्र-परिवारास गटारीच्या हटके आणि मजेशीर शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकतात.
संपली केव्हाच आषाढीची वारी
नंतर आहे गणपतीची बारी
थोडेसच दिवस हातात आहेत,
जोरात साजरी करू या गटारी
गटारीच्या शुभेच्छा!
मौसम मस्ताना,
सोबत सर्व मित्र परिवार असताना,
साजरी करा गटारी अमावस्या
गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
पाउले चालती बारची वाट
जाताना सुसाट येताना तर्रर्राट
अजून आला नाही हा घरात
अरे, पडलास की काय गटारात!
गटारीच्या खूप खूप शुभेच्छा.
काहि लोक गटारी होळी आणि 31st ची
अशी तयारी करतात जसेकाही बाकी 362 दिवस
बोर्नव्हीटा पिऊन फक्त डिंकाचे लाडूच खातात..
गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आली आली गटारी, गटारी सणाची मजाचं न्यारी एकाच दिवसात लुटून घ्या वर्षभराची मज्जा सारी
गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
मराठी लोक श्रावणाच्या स्वागतासाठी गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमावस्या हा पारंपारिक मराठी महिन्यातील शेवटचा दिवस आहे. गटारीच्या दिवशी, लोक त्यांच्या जवळच्या मित्रांसह आणि प्रियजनांसह रात्री स्वादिष्ट मांसाहारी अन्नाचा आस्वाद घेतात.