Happy Teacher's Day 2023 Messages: दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती राष्ट्रीय शिक्षक दिन (Teacher's Day 2023) म्हणून साजरी केली जाते. 5 सप्टेंबर 1888 रोजी जन्मलेल्या डॉ. राधाकृष्णन यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते एक विद्वान, तत्त्वज्ञ आणि शिक्षकही होते. त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. शिक्षकांना आदर देण्यासाठी, आपल्या जीवनातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
एका गरीब तेलगू ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या राधाकृष्णन यांनी शिष्यवृत्तीतून संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. त्यांनी तत्त्वज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आणि 1917 मध्ये 'द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर' हे पुस्तक लिहिले. त्यांनी 1931 ते 1936 पर्यंत आंध्र विद्यापीठ आणि 1939 मध्ये मदन मोहन मालवीय यांच्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) चे कुलगुरू म्हणूनही काम केले. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त तुम्ही आपल्या गुरूंना Wishes, Quotes, Images, Greetings, Whatsapp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.
सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार,
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद
आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल
माझ्या गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी टीचर डे!
माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपणा पासून ते आज पर्यंतचे सर्व मित्रपरिवार,
आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
शिकवून गेलेल्या,
अश्या सर्व शिक्षकांना शतशा वंदन
आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आमचे मार्गदर्शक होण्यासाठी,
आम्हाला प्रेरित करण्यासाठी,
आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,
आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,
तुमचे खूप खूप धन्यवाद…
हॅपी टीचर्स डे..!
2G, 3G, 4G,
5G, 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG,
शिवाय पर्याय नाही..
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!
दरम्यान, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन हा सर्व शिक्षकांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. भारतभरातील शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्था डॉ. राधाकृष्णन यांना श्रद्धांजली अर्पण करून हा दिवस साजरा करत आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना कार्ड आणि भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करतात.