
Father's Day 2024 HD Images: वडिल मुलांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मग ते त्यांचे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवन असो. म्हणून कुटुंब आणि समाजातील त्यांच्या प्रभावाचा आणि भूमिकेचा सन्मान करण्यासाठी, दरवर्षी पितृ दिन (Father's Day 2024) जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. आपल्यापैकी बहुतेक जण दररोज आपल्या पालकांप्रती आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत नसले तरी, अशा विशेष दिवशी त्यांना ते व्यक्त करण्याची चांगली संधी आहे.
यावर्षी, 16 जून 2024 (रविवार) रोजी फादर्स डे (पितृ दिन) साजरा केला जाणार आहे. फादर्स डेचा इतिहास आणि उत्पत्ती युनायटेड स्टेट्समध्ये 20 व्या शतकाच्या सुरूवातीस परत जाते. जेव्हा सोनोरा स्मार्ट डॉड नावाच्या एका तरुणीला तिच्या वडिलांचा सन्मान करायचा होता, जे गृहयुद्धातील अनुभवी आणि सहा मुलांचे संगोपन करणारे एकल पालक होते. माता आपल्या मुलांसाठी जे काही करतात त्या सर्वांच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा करण्याच्या संकल्पनेने प्रेरित होऊन सोनोरा यांनी वडिलांचा सन्मान करण्यासाठी असाच एक दिवस सुचवला. फादर्स डे निमित्त तुम्ही आपल्या वडिलांना Wishes, Greetings, Messages, Whatsapp Status द्वारे या खास दिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.





पहिला फादर्स डे अधिकृतपणे 19 जून 1910 रोजी स्पोकेन, वॉशिंग्टन, यूएसए येथे साजरा करण्यात आला. फादर्स डे वडिलांच्या सन्मानार्थ जगभरात साजरा केला जातो. या दिवशी, कुटुंबे भेटवस्तू किंवा ग्रीटिंग कार्ड देऊन उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात. तुम्ही फादर्स डे निमित्त सोशल मीडियावर खास शुभेच्छा देऊन आपल्या वडिलांचा दिवस खास करू शकता.