Mahatma Jyotiba Phule Jayanti 2023 Messages: देशातून अस्पृश्यता संपवून समाजाला सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई आणि वडिलांचे नाव गोविंदराव होते. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून माळी म्हणून व्यवसाय करत होते. ते साताऱ्याहून पुण्याला फुले आणून गजरे विकत असे. पुढे ते 'फुले' म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिबा खूप हुशार होते. त्यांनी मराठीतून शिक्षण घेतले. ते एक महान क्रांतिकारक, भारतीय विचारवंत, समाजसेवक, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. 1840 मध्ये ज्योतिबाचा विवाह सावित्रीबाईंशी झाला.
त्यावेळी स्त्री शिक्षणाबाबत लोकांची उदासीनता होती, अशा परिस्थितीत ज्योतिबा फुले यांनी समाजाला या दुष्कृत्यांपासून मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चळवळ सुरू केली. त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले. त्यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा उघडली. मुली आणि दलितांसाठी पहिली शाळा उघडण्याचे श्रेय ज्योतिबांना जाते. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खालील Wishes, Images, Whatsapp Status द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,
बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे
संस्थापक व थोर विचारवंत…
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्यशोधक समाजचे संस्थापक,
महान विचारक व दलित चिंतक
महात्मा ज्योतिबा फुले जी च्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
१९ व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक
व महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ।