Hanuman Jayanti 2024 Wishes In Marathi: हिंदू धर्मात हनुमानजींच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2024) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने ती आणखी खास असणार आहे. चैत्र महिन्याची पौर्णिमा 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 03:25 वाजता सुरू होत आहे. ही तारीख 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 05:18 वाजता संपेल. अशा स्थितीत मंगळवार 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी भक्ता एकमेकांना सोशल मीडियावर खास मेसेज, फोटो शेअर करून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Hanuman Jayanti Wishes, Hanuman Jayanti Status, Hanuman Jayanti Greetings, Hanuman Jayanti Quotes शेअर करून आपल्या मित्र-परिवारास हनुमान जयंतीच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Hanuman Jayanti 2024 Date: यंदा कधी साजरी होणार हनुमान जयंती? जाणून घ्या तारीख, तिथी आणि पूजेचा मुहूर्त)
ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला… जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
लाल रंग हनुमानजींना प्रिय मानला जातो. त्यामुळे पूजेदरम्यान हनुमानाला लाल रंगाची फुले अर्पण करू शकता. यासाठी तुम्ही हनुमानजींना लाल रंगांची झेंडूची फुले किंवा त्यांच्यापासून बनवलेली माळ अर्पण करू शकता. यासोबतच हनुमान जयंतीच्या दिवशी गुलाबाची फुले किंवा लाल जास्वदांची फुले अर्पण करून बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवू शकता.