Marathwada Mukti Sangram Din 2022 Messages: आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला असला तरी देशात अनेक संस्थाने होती, जी मुघलांच्या ताब्यात होती. यातील एक संस्थान म्हणजे हैद्राबाद. जे निजामाच्या ताब्यात होते. ते भारतात सामील होण्यास नयार नव्हते. संपूर्ण मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामाचा सेनापती कासीम रझवी हा अत्यंत क्रूर व अन्याची होता. त्यांची रझाकार ही संघटना सामान्य जनतेवर अत्याचार करत होती.
दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली. हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मात्र, निजाम ऐकण्यास तयार नव्हता. अखेर भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. या लष्करी कारवाईत निजामाचा पराभव करण्यात आला. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि मराठवाडा स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त Images, Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
जुलमी राजवट उलथवून लावत
मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी
ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले,
त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना माझे शत शत नमन !
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
जेव्हा स्वातंत्र्याचे मांगल्य गीत गात होती भारत भूमी,
तेव्हा मात्र पारतंत्र्याचे चटके सोसत होती मराठवाडा भूमी,
सांगतात आजी-आजोबा आजही तेव्हाची परिस्थिती,
निजामाच्या गुलामगिरीने त्रस्त झालेल्या जनतेची करुण कहाणी…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठवाडा मुक्तिसंग्रामात
ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
अशा शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वातंत्र्यवीरांच्या अथक परिश्रमातून स्वातंत्र झाली जेव्हा भारत भूमी,
तेव्हा मात्र मराठवाड्यातील जनता रझाकारांच्या जुलमामुळे अश्रू ठाळत होती,
अन्याय अत्याचाराचा काळोख दाटला होता चहूबाजूंनी,
तेव्हा अनेक भूमीपूत्रांनी रक्त सांडले या मायभूमीसाठी...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धडक कारवाईमुळे निजाम राजवट पूर्ण झाली खिळखिळी,
गुलामगिरीचे तोडून साखळदंड स्वातंत्र झाली मराठवाडा भूमी,
जान ठेवून भूमीपूत्रांच्या त्याग बलिदानाची...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. त्यानंतर मराठवाड्यातील जनतेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले.