Republic Day 2024 HD Image (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)

Happy Republic Day 2024 HD Images: 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा करणार आहे. या विशेष प्रसंगी संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण असेल. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथवर भव्य परेड काढण्यात येणार आहे. या परेडमध्ये सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांचे मार्च-पास्ट तसेच भारतीय हवाई दलाचे फ्लाय-पास्ट आणि मोटारसायकल पथकाच्या धाडसी पराक्रमाचाही समावेश असेल.

परेड व्यतिरिक्त, प्रजासत्ताक दिन इतर अनेक प्रकारे साजरा केला जातो. लोक प्रजासत्ताक दिनाशी संबंधित संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात आणि देशाबद्दलचे त्यांचे प्रेम दाखवतात. आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनामिनित्त काही खास WhatsApp Status, Messages, Wallpapers घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियावरून तुमचे मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना पाठवू शकता. (हेही वाचा - Republic Day 2024 Sanskrit Wishes: प्रजासत्ताक दिनानिमित्त खास संस्कृतमधील Quotes, WhatsApp Messages, GIF Greetings द्वारे शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा राष्ट्रीय उत्सव!)

समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day 2024 HD Image (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)

भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी

हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day 2024 HD Image (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)

नतमस्तक मी त्या सर्वासाठी

ज्यांनी भारतदेश घडविला…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day 2024 HD Images (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया

भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र

बनविण्यासाठी कटिबध्द होऊया...

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day 2024 HD Image (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)  

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !

शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती !

त्वामहं यशोयुतां वंदे !

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day 2024 HD Image (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)

26 जानेवारी रोजी देशाच्या राजधानीसह देशभरात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाची परेड विजय चौकातून सुरू होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा चौक, टिळक मार्ग, बहादूर शाह जफर मार्ग मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल.