Republic Day Wishes in Sanskrit (PC - File Image)

Republic Day 2024 Sanskrit Wishes: या वर्षी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन (75th Republic Day) साजरा करत आहे, जो प्रत्येक भारतीयासाठी खूप खास दिवस आहे. कारण या ऐतिहासिक तारखेला 1950 मध्ये भारताचे संविधान (Indian Constitution) लागू झाले होते. या दिवशी भारतीय राज्यघटना अधिकृतपणे लागू झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला. त्यामुळे हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा आहे. संविधान सभेचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बी.आर. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर शेवटचे अधिवेशन 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाले होते. संपूर्ण देशात संविधानाच्या अंमलबजावणीच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी तिरंगा फडकवला जातो. तसेच लोक एकमेंकाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही देतात. या विशेष प्रसंगी, आपण आपल्या प्रियजनांना संस्कृतमध्ये कोट्स, व्हॉट्सअॅप संदेश, ग्रेटिंग शेअर करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -Republic Day 2024 Maharashtra Tableau: यंदा प्रजासत्ताक दिनावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याला समर्पित असेल महाराष्ट्राचा चित्ररथ; जाणून घ्या काय आहे संकल्पना)

तुमि विद्या तुमि धर्म तुमि हरि तुमि कर्म।

त्वम हि प्राणा: शरीरे। वन्दे मातरम्‌।।

अर्थ- तूच माझे ज्ञान, तूच माझा धर्म, तूच माझे अंतरंग, तूच माझे ध्येय, तूच माझ्या देहाचा प्राण आहे. वंदे मातरम

Republic Day Wishes in Sanskrit (PC - File Image)

अत्र जन्म सहस्राणां सहस्रैरपि सत्तम।

कदाचिल्लभते जन्तुर्मानुष्यं पुण्यसञ्चयात्।।

अर्थ- शेकडो जन्मानंतर सद्गुण जागृत झाले तरच भारतभूमीवर माणूस म्हणून जन्म मिळतो.

Republic Day Wishes in Sanskrit (PC - File Image)

ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः।

तस्मात् ऐक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिणः।।

अर्थ- एकता ही आपल्या समाजाची ताकद आहे. ज्याशिवाय आपण दुर्बल आहोत. त्यामुळे देशासाठी चांगले विचार करणारेच एकतेला प्रोत्साहन देतात.

Republic Day Wishes in Sanskrit (PC - File Image)

अत्यद्भुतं ते भवतु गणतन्त्रदिवसम्!

अर्थ- तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

Republic Day Wishes in Sanskrit (PC - File Image)

आशासे यत् प्रजासत्ताकदिनस्य भवतु मङ्गलकरम् अद्भुतकरञ्च।

जीवनस्य सकलकामनासिद्धिरस्तु।

अर्थ- मला आशा आहे की प्रजासत्ताक दिन तुमच्यासाठी एक सुखद आश्चर्य घेऊन येईल. आयुष्यात तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळो.

Republic Day Wishes in Sanskrit (PC - File Image)

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कारण, हा दिवस भारतीय संविधान स्वीकारण्याचे प्रतीक आहे. हा दिवस संविधानात अंतर्भूत असलेली लोकशाही तत्त्वे अधोरेखित करतो आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. यावर्षी, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.