Ghatasthapana 2022 Wishes In Marathi: हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. हिंदू धर्मात नवरात्रीला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षात दोन नवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावर्षी शारदीय नवरात्रीला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. कलश स्थापना किंवा घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला केली जाते. माँ दुर्गाला वाहिलेल्या नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
घटस्थापनेच्या दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा केली जाते. आईला लाल फुले अर्पण केली जातात. माँ शैलपुत्रीसाठी जो भोग बनवला जातो तो गाईचे तूप आणि दुधापासून बनवला जातो. फक्त गाईचे दूध आणि तूप बनवलेल्या वस्तू माँ दुर्गेला अर्पण केल्या जातात. घटस्थापनेनिमित्त HD Images, Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास मंगलमय शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -Ghatasthapana 2022 Puja Vidhi: घटस्थापना कशी करावी? पूजा विधी आणि शुभ मुहूर्त, जाणून घ्या)
घस्थाटपना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा
घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा!
आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र आणि घटस्थापना उत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो
हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना
अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
घटस्थापनेच्या शुभेच्छा!
नवरात्रीच्या मंगल समयी देवी
तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना
तुम्हाला घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना घटस्थापना हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
हिंदू धर्मातील बहुतेक सण आणि उपवासांमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. घटस्थापनेच्या कलशात देवता, ग्रह आणि नक्षत्र वास करतात असे मानले जाते आणि कलश हे शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कलशाची स्थापना केल्याने घरात सुख-समृद्धी येते. असे मानले जाते की, नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.