मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मियांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यातील मार्गशीर्ष गुरूवारच्या व्रताप्रमाणेच शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस देखील खास आहे. मोक्षदा एकदशी (Mokshada Ekadashi) म्हणून हा दिवस पाळला जातो. या दिवशी गीता जयंती (Geeta Jayanti) साजरी केली जाते. द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्र मध्ये महाभारताचे युद्ध सुरु होण्यापूर्वी अर्जुनाला जीवन-मरण, मोह-मायाच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी गीतेचा उपदेश दिला होता. आजही भगवान कृष्णाचे ते उपदेश मनुष्यजातीला संकटातून मार्ग काढण्यासाठी फायद्याचे आहेत. मग आजचा गीता जयंतीचा दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक करण्यासाठी त्यामधील काही गोष्टी नक्की जाणून घ्या. आज गीता जयंती दिवशी तुम्ही Wishes, Messages, WhatsApp Status, Quotes म्हणून देखील Instagram, Facebook, Telegram वर शेअर करू शकाल.
भगवान श्रीकृष्णाच्या द्वारे गीतेच्या उपदेशाचे आज ही पालन केल्यास आयुष्यात सफलता मिळते. ऐवढेच नाही तर श्रीमद भगवद गीतेत व्यक्तीच्या सर्व समस्यांचे उत्तर लपलेले आहे. Lord Krishna Quotes: भगवतगीता द्वारा श्रीकृष्णाने केलेले हे '5' उपदेश बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन.
गीतेमधील काही विचार
गीता जयंतीचा मुख्य उद्देश हा प्रत्येक व्यक्तीने गीतेमधील उपदेशांचे पालन करत आपले आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्याचा असतो. गीता आपल्याला ज्ञान, धैर्य, दु:ख, लोभ आणि अज्ञानतेमधून बाहेर पडण्याची प्रेरणा देते. हा एक केवळ ग्रंथ नसून संपूर्ण जीवन आहे.