Gauri Pujan 2024 Ukhane: देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जात आहे. गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पाची आई आणि भगवान शिवाची पत्नी गौरी हिचे आवाहन केले जाते. ज्येष्ठा गौरी पूजनाला महालक्ष्मी गौरी पूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो आणि भाद्रपद शुक्ल अष्टमी तिथीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. यंदा ज्येष्ठ गौरी पूजनाचा सण 10 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. गौरी पूजनाचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. 10 ऑगस्ट रोजी ज्येष्ठा गौरींचे आवाहन केल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी गौरी पूजन आणि 12 ऑगस्ट रोजी गौरी विसर्जन होणार आहे. ज्येष्ठा गौरी पूजनाचा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या शुभ प्रसंगी लोक ज्येष्ठ गौरी पूजेच्या शुभेच्छा देऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. गौराईच्या या सणाला माहेरवाशिणींचा सण देखील म्हटला जातो. या निमित्ताने घरातील लेकी-सुना एकत्र येऊन खेळ खेळतात. नवविवहितेसाठी गौराईचा सण मोठा खास असतो. दरम्यान या सणाच्या निमित्त हमाखास सुवासिनींना ओवसं देताना-घेताना नाव घेण्याचा आग्रह केला जातो. आपल्या घरी बोलावतात, गौरी पुजन निमित्त जेवणाचा कार्यक्रम असतो. महत्वाच म्हणजे या दिवशी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतात आणि आलेल्या प्रत्येक महिला उखाण्याचा आग्रह धरतात. दरम्यान, आम्ही काही हटके उखाण्यांची यादी घेऊन आलो आहोत. हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024 Invitation Card in Marathi: गणेशोत्सवानिमित्त प्रियजनांना आमंत्रित करण्यासाठी पाठवा खास पत्रिका, येथे पाहा आमंत्रण पत्रिका
गौरी गणपती पुजननिमित्त घेता येतील अशा हटके उखाण्यांची यादी, येथे पाहा
1 . गौरी गणपतीसाठी कोकणात जाताना, लागतात फार रांगा,
बाप्पा ____________ रावांना सुट्टी देत नाही त्यांचा बॉस, जरा त्यांना सांगा.
2. सोनपावलांनी आली, आमच्या घरी गौरी माता,
_________ रावांचे नाव घेते, गौराईसाठी आरती गाता.
3. गौराई माते, नमन करते तुला,
________ रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.
4. गौरी-गणपती समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
--- नाव घेते, गौरी पुजनाच्या दिवशी
5. गौराई च्या समोर, ठेवले केशरी पेढे
__चे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे?
6. नाही मला द्वेष, मत्सर, नाही हेवा ... चे नाव घेतय ... ची सून सगळ्यांनी लक्ष ठेवा !