Gatari 2019 Special Greetings and Status: श्रावण (Shravan) हा हिंदू धर्मियांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यापासून पुढील सुमारे 2-3 महिने सणांची रेलचेल सुरू राहणार आहे. त्यामुळे उपासनेच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व असलेल्या या पर्वात मांसाहार, मद्यप्राशन यासारख्या या काळात आरोग्याला त्रासदायक ठरणार्या अनेक गोष्टी कटाक्षाने टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्येला (Ashadh Amavasya) 'गटारी अमावस्या'(Gatari Amavasya) साजरी केली जाते. या दिवशी मनसोक्त मांसाहार, चमचमीत जेवणाचा बेत करून सेलिब्रेशन केलं जातं. मग या सेलिब्रेशनमध्ये तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांसोबत सहभागी व्हा. पण तुम्ही आज कामाच्या व्यापात असाल तर आजची गटारीची सोय तुम्हांला केवळ व्हर्च्युअल जगात एकमेकांना व्हॉट्सअॅप मेसेज (WhatsApp Messages), स्टेट्स (Status), फेसबूक मेसेंजर (Facebook Messenger) याच्या माध्यमातून शुभेच्छा देऊनच सेलिब्रेट करावा लागेल. मग तुम्ही आता गटारीच्या शुभेच्छा शेअर करण्यासाठी या खास HD Images, Greetings च्या माध्यमातून शेअर करून देऊ शकता. Gatari Amavasya 2019 Jokes & Memes: गटारीच्या शुभेच्छा मजेशीर Wishes, WhatsApp Messages and Status च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्र
गटारी अमावस्या हा दिवस खरंतर दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. (नक्की वाचा: Deep Amavasya 2019: दीप अमावस्या का आणि कशी साजरी करतात?)
गटारी अमावस्येच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटिंग्स
यंदा 2 ऑगस्ट 2019 पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. तर दाते पंचांगानुसार आषाढी अमावस्या 1 जुलै दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून 1 ऑगस्टच्या सकाळी 8.42 मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे यंदा अनेकांसाठी मांसाहाराचा दिवस म्हणजे बुधवार आणि गटारी एकत्र आल्याने तुमच्या आवडत्या मांसाहाराच्या थाळीवर ताव मारा नक्की!