Gatari 2019 Jokes & Memes (File Photo)

Gatari Amavasya 2019 Wishes and Funny Status: यंदा 2 ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याला (Shravan Month) सुरूवात होणार आहे. श्रावण महिन्यापासून सुरू होणारी सणांची, व्रत वैकल्यांची रेलचेल यामुळे अनेक मांसाहारीप्रेमींना घरी मासे, चिकन, मटण यांचा आस्वाद घेता येणार नाही. त्यामुळे येत्या श्रावण सुरू होण्यापूर्वीच अमावस्येदिवशी (Gatari Amavasya) मांसाहार ताव मारला जातो. पुढील व्रत वैकल्यांच्या काळात मांसाहाराप्रमाणेच मद्यपानासारख्या सवयींना देखील दूर ठेवलं जातं त्यामुळे तुम्ही श्रावणापूर्वी 31 जुलै दिवशी सेलिब्रेशनचा प्लॅन करताय? मग आजपासूनच तयारीला सज्ज व्हा. तुमच्या मित्रांसोबत या गटारीच्या सेलिब्रेशनला सोशल मीडियात सुरूवात करणार असाल तर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून गटारीच्या शुभेच्छा देणारी ही खास HD Greetings, Images, Wishes, Jokes आणि Memes च्या माध्यामातून सुरूवात करा. महाराष्ट्रात श्रावण सुरू होण्याआधी कधी पर्यंत साजरी करू शकाल 'गटारी'?

यंदा गटारीच्या दिवशी नेमका बुधवार म्हणजे अनेकांसाठी मांसाहाराचा दिवस आल्याने सेलिब्रेशन जोरात असणार आहे. मांसाहारा सोबत सध्या अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्याने वातावरणही अल्हाददायक आहे. त्यामुळे अनेकांनी जवळच्या रिसॉर्ट्स, फार्म हाऊसमध्ये गटारी सेलिब्रेशनचे प्लॅन बनवले आहेत. गटारी हा सण नसून हे सेलिब्रेशनचं केवळ एक निमित्त आहे. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून मित्रांसोबत गटारीच्या सेलिब्रेशनचे खास मेसेजेस शेअर करून सेलिब्रेशनला सुरूवात करा. Gatari Special Fish Recipes: श्रावणाआधी ताज्या माशांचा मनमुराद आस्वाद घ्यायचाय, तर नक्की ट्राय करा माशांच्या या 5 हटके रेसिपीज

गटारीच्या शुभेच्छा आणि मजेशीर मिम्स

Gatari 2019 Jokes (Photo Credits: File Photo)
Gatari 2019 Jokes (Photo Credits: File Photo)
Gatari 2019 Jokes (Photo Credits: File Photo)
Gatari 2019 Jokes (Photo Credits: File Photo)
Gatari 2019 Jokes (Photo Credits: File Photo)

गटारी अमावस्येच्या शुभेच्छा देणारी खास GIF Images

via GIPHY

via GIPHY

महाराष्ट्रात येत्या 2 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे पुढील 25-30 दिवस अनेकांना मांसाहाराचा आनंद घेताच येणार नाही. श्रावण संपल्यानंतर 2 सप्टेंबरपासून गणपतीचं आगमन होणार आहे.