Ganga Saptami 2019:  गंगा सप्तमी म्हणजे काय? पृथ्वीवर कसं झालं गंगामाईचं आगमन
Ganga Saptami 2019 (Photo Credits: Twitter/ ANI)

Ganga Jayanti 2019: भारतामध्ये गंगा सप्तमी (Ganga Saptami) हा दिवस गंगा जयंती म्हणून साजरा केला जातो. वैशाख महिन्यातील शुक्लपक्ष सप्तमी (Vaishakh Shukla Saptami) दिवशी गंगेचा उगम झाला अशी अख्यायिका असल्याने आज वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहात गंगा सप्तमीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा सण शनिवार 11 मे 2019 दिवशी साजरा केला जाणार आहे. कोकण: राजापूर गंगा 5 महिन्यात पुन्हा अवतरली; भाविकांमध्ये दर्शनाची उत्सुकता (Watch Video)

गंगा सप्तमी महत्त्व

भगीरथांच्या तपस्येला प्रसन्न होऊन गंगामाई पृथ्वीवर आली. शास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, तो दिवस वैशाख शुक्ल सप्तमीचा होता. या दिवशी गंगा माई भगवान शंकराच्या जटांच्या माध्यमातून स्वर्गातून पृथ्वीवर अवतीर्ण झाली. हा दिवस गंगा जयंती म्हणून साजरा केला जातो.

गंगा सप्तमी 2019 सेलिब्रेशनची क्षणचित्र  

गंगेच्या पाण्यामध्ये डुबकी मारली तर पाप नष्ट होते असा समज आहे. त्यामुळे अनेक शुभ कार्यामध्ये गंगेचं पाणी वापरलं जातं. आजच्या दिवशी गंगेमध्ये डुबकी मारणं शक्य नसेल तर किमान आंघोळीच्या पाण्यात गंगेचे काही थेंब मिसळून त्याने आंघोळ केली जाते.