Rajapur Ganga 2019: कोकणातील राजापूर (Rajapur) तालुक्याची ओळख असलेल्या 'गंगे'चं गुरूवार( 25 एप्रिलच्या) दिवशी पाच महिन्यात पुन्हा आगमन झालं आले. प्राचीन काळापासून राजापूरची गंगा (Rajapur Ganga) ही दर तीन वर्षांनी प्रकट होत असे. मात्र मागील काही वर्षापासून गंगा प्रकट होण्याच्या चक्रामध्ये बदल झाले आहेत. मागील वेळेस 15 नोव्हेंबर 2018 दिवशी गंगा आली होती. त्यानंतर 100 दिवस वास्तव्यास असलेली गंगा गेली आणि आज पुन्हा अवतरली. Summer Special Trains: 'कोकण रेल्वे' मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स
राजपूरची गंगा पुन्हा आली
राजपूर मध्ये सकाळी गुरूवार( 25 एप्रिलच्या) दिवशी 8 वाजण्याच्या सुमारास गंगामाई अवतरल्याची माहिती मिळाली आहे. उन्हाळे भागात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत तर राजापूर शहरापासून जवळच असलेल्या एका टेकडी परिसरात सुमारे 14 कुंडांमध्ये आपोआप पाणी भरतं. सध्या राजापूरामध्ये ही 14 ही कुंडं भरलेली आहेत. एरवी खडखडाट असलेल्या या गंगेमध्ये पाणी आलं म्हणजे 'गंगा आली' असं समजलं जाते. राजापूरची गंगा ही एक नैसर्गिक चमत्कृती आहे.
यंदाच्या राजपूर गंगेची खास दृश्य
#RajapurGanga2019 #Rajapur #Ganga #Konkan pic.twitter.com/90HmBx6jQ3
— ABC (@ABC20467372) April 26, 2019
भाविक गंगा आल्यानंतर दर्शनासाठी आणि या पाण्याने स्नान करण्यासाठी सध्या मोठी गर्दी करत आहेत.
ब्रिटीश काळापासून अगदी शिवरायांच्या दस्तावेजात राजापूर गंगेचा उल्लेख
ब्रिटिश कालखंडातील 1883 च्या दस्ताऐवजामध्येही गंगेच्या आगमनाची नोंद आहे. त्यानंतर शिवकालीन कालखंडामध्येही शिवराय, गागाभट्ट यांनी या स्थळाला भेट दिल्याचे उल्लेख आढळतात.