Ganeshotsav 2020: घरच्या घरी इको फ्रेंडली घटकांचा वापर करून घरच्या घरी गणेश मूर्ती कशी बनवाल? (Watch Video)
Make Ganpati at Home (Photo Credits: Video Grab)

भाद्रपद गणेश चतुर्थी आता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. बुद्धीची देवता गणराय विघ्नहर्ता म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे दरवर्षी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणरायाचं घरात स्वागत, पूजा आणि निरोप असे सारे सोहळे धूमधडाक्यात साजरे केले जातात. मात्र यंदा या सार्‍या आनंदावर कोरोना व्हायरसची दहशत आहे. अजूनही महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने साधेपणाने आणि कमीत कमी लोकांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने यंदा गणेशमूर्तीची उंची 2 फूट आणि ती प्रामुख्याने इको फ्रेंडली वस्तूंपासून बनलेली असावी असं आवाहन गणेशभक्तांना केलं आहे. यंदा तुमच्या घरी देखील गणेशोत्सवासाठी गणरायाच्या मूर्तीचं बुकिंग करणं बाकी असेल तर थांबा! लॉकडाऊनच्या काळाचा वापर करून इको फ्रेंडली अंदाजात तुम्ही घरच्या घरी देखील गणपती बाप्पाची मूर्ती घडवू शकता. नक्की वाचा:  Ganeshotsav 2020: BMC कडून घरगुती गणेशोत्सव साठी नियमावली जारी; श्रींच्या आगमन, विर्सजनाला केवळ 5 जणांना मुभा.

22 ऑगस्ट दिवशी यंदा भाद्रपद गणेश चतुर्थी आहे. त्या दिवशी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून पुढील काही दिवस पूजा केली जाते. यंदा गणेश आगमन आणि विसर्जनाला परवानगी नसल्याने घरातच गणपतीची बनवून ती घरच्या घरीच विसर्जन करण्याचा प्रयत्न करा असं आवाहन करण्यात आले आहे. मग यंदाचा कोरोना व्हायरस लॉकडाऊन मध्ये इको फ्रेंडली अंदाजात गणेशोत्सव साजरा करायचा आहे मग बाप्पाची मूर्ती तुम्हीच घडवा आणि या सणाचा आनंद द्विगुणित करा. बाप्पाची मूर्ती घरच्या घरी बनवायची कशी? असा तुम्हांला प्रश्न पडला असेल तर पहा हे व्हिडिओ

घरच्या घरी गणेश मूर्ती कशी बनवाल?

शाडूची गणेशमूर्ती

गणेशमूर्तीची सजावट 

आजकाल बाजारात इको फ्रेंडली पदार्थांचा समावेश असलेल्या घटकांचा, मातीचा गोळा तयार मिळतो. साच्यामध्ये तो घालून तुम्हांला घरच्या घरी आकर्षक मूर्ती बनवता येऊ शकते. सोबतच आता इको फ्रेंडली रंग देखील उपलब्ध आहेत. त्याचा वापर देखील गणेश मूर्ती सजवण्यासाठी केला जाऊ शकतो.

इको फ्रेंडली गणेशमूर्तींमुळे यंदा सणदेखील साधेपणाने साजरा करता येऊ शकतो आणि पर्यावरणाचेही नुकसान टाळता येईल. तसेच विसर्जनाला चौपाटी, तलावांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मदत होईल. यामुळे पर्यावरण पूरक सण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायलादेखील मदत होणार आहे.