Ganesh Visarjan Slogans in Marathi: दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थी हा सण उत्सहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून 10 दिवस गणपतीच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते आणि नंतर बाप्पाच्या मूर्तीचे नदी किंवा तलावात पूर्ण विधीपूर्वक विसर्जन केले जाते. हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात थाटामाटात, गणपतीचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. देशात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. गणपती बसल्यावर जसा आनंद आणि उल्हास दिसतो, तसाच आनंद बाप्पाला निरोप देतांना गणेश भक्तांमध्ये दिसून येतो.
म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी गणेश विसर्जनानिमित्त गणपती विसर्जन स्लोगन, स्टेटस, कोट्स घेऊन आलो आहोत. गणेश विसर्जनाच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तुम्हाला खालील स्लोगन, Quotes नक्की उपयोगात येतील.
एक दोन तीन चार...
गणपतीचा जयजयकार...!
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
एक दो तीन चार,
गणपतीचा जयजयकार,
पांच छह सात आठ,
गणपति है सबके साथ
कहा चली हो गोरिया, गणपती बाप्पा मोरया!
ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार,
गणपती बाप्पा सुपरस्टार
गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशीची 8 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9.02 वाजल्यापासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6:07 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीचे व्रत 9 सप्टेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही वरील स्लोगन म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप देऊ शकता.