दीड दिवसीय गणपती विसर्जन शुभ मुहूर्त (फोटो सौजन्य - File Image)

Ganesh Visarjan 2024 Muhurat: आज 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024)च्या दिवशी सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. भगवान गणेशाचा जन्मदिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीला असतो, म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. आजपासून पुढील 10 दिवस गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) साजरा होणार आहे. त्यानंतर गणेशाचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024) करण्यात येईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते.

प्रत्येकाच्या घरात गणपती 10 दिवस राहत नसला तरी लोक त्यापूर्वीच त्याचे विसर्जन करतात. वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 वाजता सुरू होईल. ही तारीख मंगळवार, 17 ऑगस्ट रोजी रात्री 11:44 वाजता संपेल. अशा स्थितीत 17 सप्टेंबर रोजी उदयतिथीनुसार अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे. 17 सप्टेंबरला गणेशाचे विसर्जनही होणार आहे. (हेही वाचा -Ganesh Visarjan 2024 Dates: गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत 1.5, 3, 5, 7, 10 दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून)

तथापी, अनेकजण 1.5, 3, 5, 7, 10 दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. आज आम्ही तुम्हाला दीड दिवशीय गणपतीच्या विसर्जनाची तारीख आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात दीड दिवशीय गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि तारीख... (हेही वाचा - Ganpati Invitation Card In Marathi Template Free Download: गणेश चतुर्थीनिमित्त WhatsApp Wishes, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा हटके आमंत्रण पत्रिका, येथे पाहा)

दीड दिवशीय गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त -

ॉदीड दिवशीय गणपतीचे विसर्जन रविवार, 8 सप्टेंबर, 2024 रोजी करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीड दिवशीय गणपतीचे विसर्जन करण्यात येते. दीड दिवशीय गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि शुभ वेळ 02:08 PM ते 03:41 PM, 06:47 PM ते 11:08 PM, 02:03 AM ते 03:30 AM पर्यंत असणार आहे. या वेळेत तुम्ही दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करू शकता.