Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

Ganesh Visarjan 2022 Messages: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला प्रत्येक घरात गणपतीची पूजा केली जाते. त्याच वेळी, यानंतर 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होते. मात्र, अनेक ठिकाणी दीड दिवस, पाच दिवसांनीही गणपती विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. यंदा 9 सटेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. ज्या उत्साहात गणेशाचे आगमन घरोघरी होते, त्याच उत्साहात गणेश उत्सवाची सांगता करण्याचा दिवस सर्वत्र ढोल ताशा गुलाल आणि नाचत गाजत साजरा केला जातो.

बाप्पाच्या जाण्याचे दुःख जरी मनात असले तरी तू पुढल्या वर्षी लवकर ये अशा गजरात त्याच्या पुढच्या वर्षीच्या आगमनाची आतुरता मनात ठेवून भक्त आनंदाने बाप्पाला निरोप देत असतात. आम्ही या पोस्ट मध्ये गणेश अनंत चतुर्दशी संदेश, Ganesh Anant Chaturdashi Quotes In Marathi, Ganesh Visarjan Status In Marathi, Ganesh Visarjan Banner, Ganesh Visarjan Sms, Ganesh Visarjan Messages, Ganesh Visarjan Sad Quotes in Marathi घेऊन आलो आहोत. ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

आभाळ भरले होते तु येतांना,

आता डोळे भरून आलेत तु जातांना,

काही चुकलं असेल तर माफ कर,

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

रिकामे झाले घर,

रिकामा झाला मखर,

पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्यासाठी

थाटामाटात निघाला माझा लंबोदर

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

बाप्पा चालले आपल्या गावाला,

चैन पडेना आमच्या मनाला,

ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..

तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..

त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..

हीच तुझ्या चरणी प्रार्थना”

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

आज अनंत चतुर्दशी!

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व

गणेश भक्तांच्या मनातील

सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,

हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

दाटला जरी कंठ तरी,

निरोप देतो तुला हर्षाने..

माहीत आहे मला देवा,

पुन्हा येणार तु वर्षाने..!

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या..!!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

वरील मेसेज सोशल मीडियावर शेअर करून तुम्ही गणपती बाप्पाला निरोप देऊ शकता.