Ganesh Jayanti 2021 Marathi Wishes: माघी गणेश जयंती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मदिवस. माघ महिन्याच्या शुल्क पक्षात चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला, अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा 15 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती साजरी होणार आहे. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र असलेले गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहेत. सर्व कार्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच बाप्पावर अनेकांची विशेष भक्ती आहे. गणेश जयंती निमित्त तर ही भक्ती अधिक द्विगुणित होते. सर्व गणेशभक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. मात्र यंदा कोविड-19 सावटामुळे गणेश जयंती उत्सव विशेष खबरदारी घेत साजरा करावा लागणार आहे. (माघी गणेश जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images च्या माध्यमातून शेअर करुन गणेशभक्तांना द्या खास शुभेच्छा!)
सध्याच्या डिजिटल युगात गणपती बाप्पाच्या जन्मदिवसानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, GIF's तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) वर शेअर करुन शुभेच्छा देऊ शकता. मग यंदा नातेवाईक, मित्रमंडळी, गणेशभक्तांसह हे शुभेच्छा संदेश नक्की शेअर करा. (Ganesh Jayanti 2021 Rangoli Design: गणेश जयंती ला काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन)
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
माघी गणेश जयंती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे...
माघी गणेश जयंती च्या मंगलमय शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया!
माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती|
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती||
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
नसानसात भरली स्फुर्ती..
गणपती बाप्पा मोरया!
माघी गणेश जयंती च्या शुभेच्छा!
GIF's
माघी गणेश चतुर्थी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. तर सार्वजनिक स्वरुपातही हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे सरकारने काही विशेष नियम लागू केले आहेत. त्यामुळे यंदा काळजी घेत माघी गणेशोत्सव साजरा करुया. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठीकडून माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!