
Maghi Ganesh Jayanti 2021 Messages: माघ मासात शुक्ल पक्षात येणार्या चतुर्थीला गणेश जयंती असते. पौराणिक मान्यतानुसार, माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या विनायक चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. यंदा गणेश जयंती सोमवार, 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. ग्रोगोरियल कॅलेंडर प्रमाणे माघ मास जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येतो.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 14 फेब्रुवारी रोजी रविवारी रात्री 01:58 वाजता सुरू होईल. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 03:36 वाजता या चतुर्थीची समाप्ती होईल. माघी गणेश जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images च्या माध्यमातून शेअर करुन गणेशभक्तांना खास शुभेच्छा संदेश नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेजेस उपयोगात येतील. (वाचा - Maghi Ganesh Jayanti 2021 Invitations: माघी गणेश जयंती निमित्त घरी बाप्पाच्या दर्शनाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, HD Images)
ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया !

सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव…
शुभ सकाळ !

तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या
पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

।। ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त तुमच्या आगमनाची,
कारण, चतुर्थी आमच्या गणेशाची
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

गणेश जयंतीच्या दिवशी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह देशभरातील गणेश मंदिरांमध्ये गणपतीची जयंती साजरी केली जाते. गणेश जयंती दिनाचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजन करतो, त्याला पुण्य लाभते. तसचे च्या व्यक्तीला मरणानंतर मोक्ष प्राप्त होतो.