Ganesh Chaturthi Wishes In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Ganesh Chaturthi 2024 Wishes In Marathi: देशभरात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) चा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कॅलेंडरनुसार हा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला सुरू होतो. गणेशोत्सव 10 दिवस साजरा केला जातो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचा जन्म झाला असे मानले जाते. वर्ष 2024 मध्ये, ही तारीख 7 सप्टेंबर आहे. या दिवशी भक्त घरोघरीही गणेशाची प्रतिष्ठापना करतात.

यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योगही तयार होणार आहेत. त्यामुळे हा सण आणखीनच मंगलमय झाला आहे. या दिवशी रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग असतील, यासोबतच दिवसभर ब्रह्मयोगही असेल. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्सहात साजरी होते. तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी सोशल मीडियावर मीडियावर WhatsApp Messages, Wishes, Quotes, Images, Greetings द्वारे गणेशभक्तांना मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही खास ईमेजस घेऊन आलो आहोत तुम्ही त्या मोफत डाऊनलोड करू शकता. (Lalbaugcha Raja First Look HD Images: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आला समोर; WhatsApp Status, Facebook Message द्वारे करा शेअर, See Pic)

कोणतीही येऊ दे समस्या

तो नाही सोडणार आमची साथ

आहे आम्हाला सार्थ विश्वास

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात

भरभरून सुखसमृद्धी येवो

हीच गणरायच्या चरणी प्रार्थना

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

वक्रतुंड महाकाय

सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव

सर्वकार्येषु सर्वदा

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

जयघोष ऐकोनी देवा तुझा,

जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड

कर जोडून उभा द्वारी,

लागली तुझ्या आगमनाची ओढ

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

सर्व मांगल्य मांगल्ये,

शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यंबके गौरी,

नारायणी नमोस्तुते

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या काळात अनेक भक्त घराघरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी योग्य वेळी गणेशाची स्थापना करावी. यावेळी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:02 ते दुपारी 1:34 पर्यंत असेल.