Gandhi Jayanti 2020 (Photo Credit- File Image)

Gandhi Jayanti 2020 Image: महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार समजले जाते. त्यामुळे त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे गांधीजींचा जन्म झाला. यंदा गांधी जयंतीवर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. महात्मा गांधी हे पेशाने वकिल होते.

गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांच्या अधिकारांसाठी लढा दिला. तेथे त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करून अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा देण्यासाठी खालील फोटोज तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Gandhi Jayanti 2020 Messages: गांधी जयंतीच्या शुभेच्छा मराठी Wishes, Quotes द्वारा WhatsApp, Facebook Status वर शेअर करत साजरा करत महात्मा गांधीजींचा जन्मदिन)

Gandhi Jayanti 2020 (Photo Credit- File Image)
Gandhi Jayanti 2020 (Photo Credit- File Image)
Gandhi Jayanti 2020 (Photo Credit- File Image)
Gandhi Jayanti 2020 (Photo Credit- File Image)
Gandhi Jayanti 2020 (Photo Credit- File Image)

दरम्यान, 1914 मध्ये गांधीजी भारतात आले. त्यानंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिलं. 1917 मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. त्यानंतर 1920-22 मध्ये अहिंसक असहकार आंदोलन केले. याशिवाय 1930-32 दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग, व्यक्तिगत सत्याग्रह आणि 1942 चे भारत छोडो आंदोलन यामुळे महात्मा गांधी यांचे नेतृत्व अवघ्या जगाला समजले.