Friendship Day Songs 2019: दोस्तांच्या आठवणींत रममाण करतील ही 10 बेधुंद गाणी
Friendship Song (Photo Credits: YouTube)

शब्दांच्या पलीकडची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत जपणे हे काही ऐ-या-गै-याचं काम नाही मित्रांना. आयुष्यात मित्र बनवणे कठीण गोष्ट नाही. पण ती मैत्री जिवापाड जपणे खूप महत्त्वाचे असते. ते म्हणतात ना, रोज आठवण यावी असं त्याच्यात काही नाही, रोजच भेट घ्यावी असंही काही नाही. तो आपल्याला विसरणार नाही याला खात्री म्हणतात आणि त्याला याची खात्री आहे त्यालाच मैत्री म्हणतात. या नात्याचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे (Friendship Day). आज जगभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात, आनंदात फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल. या दिवशी आपल्यापासून कोसो दूर असलेल्या आपल्या खास मित्रांची आठवण आल्या खेरीज राहणार नाही.

मैत्री वर आजपर्यंत मराठी आणि हिंदीमध्ये अनेक चित्रपट आले. हे चित्रपट जितके गाजले त्याच्या दुप्पट त्या चित्रपटातील गाणी. ही अशी गाणी आहेत ज्याच्या शब्दाशब्दातून आपल्या आपण ती मैत्री जगतोय असे वाटेल. ऐकूया अशी बेधुंद करणारी मराठी-हिंदीतील 10 सुपरहिट गाणी....

1. जिंदगी जिंदगी

2. दिल चाहता है

3. तेरी मेरी यारियां

4. यारों दोस्ती बड़ी हसीन है

5. यारा यारा

6. तेरे जैसा यार कहा

हेही वाचा- Friendship Day 2019 Gift Ideas: तुमच्या हटके मित्रांसाठी 10 हटके गिफ्ट आयडियाज

7. बिनधास्त बेधडक

8. चढ़ी मुझे यारी तेरी ऐसी

9. यारों की यारी

10. करूया आता कल्ला कल्ला

शेवटी काय मित्रांनो मैत्री ही अशी गोष्ट आहे, जी नुसती गाजवायची नसते तर सजवायची असते, मैत्रीत ना जीव दयायचा, ना घ्यायचा असतो, तर मैत्रीत जीव लावायचा असतो. बरोबर ना! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..