
Friendship Day 2019 Marathi Messages & Wishes: मैत्री ही एक अशी गोष्ट आहे ज्याला रंग नाही तरी ती रंगीत आहे, ज्याला चेहरा नाही तरी ती सुंदर आहे. अशा या सुंदर आणि रंगीत मैत्रीला आणखी रंगीन करण्यासाठी येत्या 4 ऑगस्टला जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जवळ असलेल्या किंवा आपल्यापासून लाखो मैल दूर असलेल्या मित्रांना फ्रेंडशिप डे शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटींग्स, SMS,Images, Whatsapp Status या माध्यमांचा उपयोग करतील. अशा वेळी फ्रेंडशिप डे ला काय मेसेज पाठवावे हे मोठे कोडच आहे. कारण मैत्री ही एक अशी गोष्ट आहे जी शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
मात्र आपल्या खास, जिवलग मित्राची आठवण या दिवशी येणार नाही असे होणारच नाही. त्यामुळे आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या मित्राला खाली फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास मेसेजेस...





हेही वाचा- Friendship Day 2019 Gift Ideas: तुमच्या हटके मित्रांसाठी 10 हटके गिफ्ट आयडियाज
मैत्री हे एक असं नातं आहे ज्यात बाकी सारी नाती एका बाजूला आणि मैत्रीचे ते गोड नातं एका बाजूला. मैत्रीच नातं हे खूप पवित्र असतं पण विश्वासघातामुळे मलून होऊन जात, पण तोच विश्वास जरा टिकून राहिला तर मैत्रीचं हे नातं आयुष्यभर सारथी म्हणून राहतं. लेटेस्टली कडून फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा