Father's Day Celebration Ideas: वडील आणि मुलांचे नाते गोडआंब्यासारखे आंबट गोड   असते. वडिलांचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते, परंतु त्यांचे भविष्य घडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वडिलांना कधीकधी कठोर व्हावे लागते. अशा स्थितीत आईसमोर मुलं जेवढं फ्रि असतात, तेवढं वडिलांसोबत राहत नाही. पण जेव्हा त्यांना काही हवे असते किंवा एखाद्या गोष्टीसाठी परवानगी लागते तेव्हाच फक्त मुलं वडिलांकडे जातात.  पण अनेकदा त्यांना त्यांच्या भावना उघडपणे मांडता येत नाहीत. या भावना वडिलांसमोर व्यक्त करण्यासाठी जगभर फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी आहे, यावेळी 19 जून रोजी फादर्स डे आहे.

वडिलांसोबत बाहेर फिरायला जा 

फादर्स डे निमित्त वडिलांना खास वाटावे म्हणून  वडिलांसोबत वेळ घालवा. तुम्ही एकत्र राहत असाल तर तुम्ही कुठेतरी हँगआउट करायला जाऊ शकता. एकत्र चित्रपटाला जा, लंच किंवा डिनरसाठी बाहेर जा. तुम्ही वडिलांसोबत शहरातील मंदिरातही जाऊ शकता.शहरात एखादे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असेल, तर तुम्ही संपूर्ण कुटुंबासह तेथे सहलीला जाऊ शकता. एकंदरीत, दिवसभर पप्पासोबत राहायचे आणि त्यांना आवडेल ते करायचे. बाबांना खरेदीला घेऊन जा.

फादर्स डे सरप्राईज पार्टी

वडिलांचा  दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही सरप्राईज पार्टीची योजना करू शकता. त्यांच्यासाठी घरी किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये लंच किंवा डिनरची योजना करा. ही पार्टी खास बनवण्यासाठी तुम्ही पापाच्या मित्रांनाही आमंत्रित करू शकता. त्यांना त्यांच्या  मित्रांना भेट द्यायला आवडेल.

 सरप्राइज गिफ्ट 

फादर्स डेच्या दिवशी सकाळी वडील उठण्यापूर्वी तुम्ही त्यांच्या खोलीत भेटवस्तू ठेवू शकता. जेव्हा ते  उठतील आणि भेटवस्तू पाहतील त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. तुम्ही वडिलांना त्यांच्या आवडीचे कोणतेही गिफ्ट देऊ शकता. भेटवस्तू महाग किंवा स्वस्त असावी असे नाही, त्यांना जे आवडते ते तुम्ही देऊ शकता.

पप्पांसाठी खास नाश्ता बनवा

मुलगा असो की मुलगी, वडिलांसाठी काहीही केले की वडिलांना ते नक्कीच आवडते. अनेकदा वडील मुलींच्या हाताने शिजवलेले अन्न कमी चविष्ट असले तरी खातात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या वडिलांसाठी त्यांच्या आवडीची कोणतीही डिश स्वतःच्या हातांनी बनवून देऊ शकता. मुलांनी वडिलांसाठी खीर, हलवा किंवा कोणताही आवडता पदार्थ बनवला तर त्यांनाही ते आवडेल.

 मनातील गोष्ट वडिलांना सांग

जर तुम्ही तुमच्या वडिलांशी तुमचे प्रेम व्यक्त करू शकत नसाल तर. दैनंदिन जीवनात, तुम्ही त्यांना सांगू शकत नाही की तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे, म्हणून फादर्स डे ही तुमच्यासाठी तुमच्या वडिलांना त्यांच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मुलं बर्‍याचदा आईला 'आय लव्ह यू आई' म्हणतात .पण लव्ह यू डॅड म्हणण्यासाठी फादर्स डे पेक्षा चांगला दिवस नसेल. तुम्ही त्यांना कार्ड किंवा पत्र लिहू शकता,  तुमच्या भावना पापासोबत शेअर करा. पप्पा तुम्हाला किती आवडतात ते त्यांना सांग.