आज जगभरातील बहुतांश देशात फादर्स डे (Father's Day) साजरा होत आहे. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा सर्ज इंजिन जाएंट गुगलने (Google) GIF ग्रिटींग च्या माध्यमातून डूडल (Doodle) साकारून फादर्स डे म्हणजेच बाबांचा दिवस 2021 निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजचं डूडल हे पॉप अप असून सर्वांना फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी साकारण्यात आल्याचे गुगलने सांगितले आहे. आजचे क्रिएटीव्ह डूडल Olivia When तयार केले आहे. बालपणी फादर्स डे निमित्त तुम्ही वडीलांसाठी एखादे ग्रिटिंग नक्कीच बनवले असेल. आजचे डूडल हे तुम्हाला त्या आठवणीत घेऊन जाते. यापूर्वी गुगलने आजच्या डूडलमागील काही चित्रे आणि पडद्यामागची गंमत शेअर केली होती.
वडीलांच्या प्रेम आणि आदरापोटी साजरा केला जाणारा फादर्स डे यंदा 20 जून रोजी साजरा होत आहे. हा दिवस अमेरिका, युके, कॅनडा, भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. (Happy Fathers Day 2021 Wishes In Marathi: फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Messages, WhatsApp Status, Quotes शेअर करत खास करा बाबांचा आजचा दिवस)
Google Doodle GIF:
Fun with Google Doodles: Father's Day 2021 (June 20) #googledoodle pic.twitter.com/7rDt8hE4Is
— Allison Baerin (@allisonbaerin) June 19, 2021
History.Com नुसार, डिसेंबर 1907 मध्ये अमेरिकेतील Fairmont Coal Company च्या खाणीत झालेल्या अपघातामध्ये एकूण 362 पुरुषांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या पुरुषांना आदरांजली वाहण्यासाठी 5 जुलै 1908 रोजी West Virginia चर्चमध्ये एक समारंभ आयोजित करण्यात आला होता.
अमेरिकेत Sonora Smart Dodd यांनी फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी हा दिवस वडीलांसाठी समर्पित केला. त्यानंतर जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी फादर्स डे साजरा होऊ लागला. भारताने देखील ही संस्कृती स्वीकारली. आता भारतातही या दिवशी वडीलांना शुभेच्छा, गिफ्ट देऊन फादर्स डे अगदी उत्साहात साजरा केला जातो.