Father’s Day यंदा 20 जून दिवशी साजरा होणार आहे. जगभरात या दिवशी पुरूषामधला 'बाप' माणूस आणि त्याचं लेकरांसोबत असलेले खास नातं सेलिब्रेट केले जातं. खरं तर आई-बाबा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हक्काची खास माणसं असल्याने त्यांचा दिवस, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याचा केवळ एक दिवस असू शकत नाही. पण जवळच्याच व्यक्तींना थॅक्स आणि सॉरी बोलणं कठीण जात असल्याने ऐरवी तुमचं प्रेम वडिलांप्रती व्यक्त करू शकत नसाल तर आजच्या फादर्स डे चं औचित्य साधून तुम्ही त्यांना हॅप्पी फादर्स डे (Happy Father's Day) म्हणून हा दिवस स्पेशल करू शकता. वडिलांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी ही काही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, Messages, Wishes, WhatsApp Status, GIFs त्यांच्यासोबत शेअर करू शकता. आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडीयाच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कोपर्यात कुठेही कधीही असणार्या व्यक्तीच्या संपर्कात राहू शकता.
बाबा हा प्रत्येक मुला-मुलीसाठी त्यांचा पहिला सुपाहिरो असतो. मग अशा या सुपर हिरोचा एक दिवस स्पेशल करून त्याला कामाच्या धकाधकीतून थोडं बाजूला काढा आणि यंदाची कोविड परिस्थिती पाहून थोडक्यातच सेलिब्रेशन करा. Father's Day 2021 Gift Ideas: फादर्स डे दिवशी वडिलांना खुश करायचं असेल तर द्या ‘हे’ खास गिफ्ट!
हॅप्पी फादर्स डे 2021
जगातील प्रत्येक 'बाप' माणसाला
फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडं करून
आधार देतो मनामनाला
फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
कधी खिसा रिकामा असला तरीही
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाहीत
माझ्या वडीलां इतक्या मनाने श्रीमंत
व्यक्तीला मी अजून पाहिलेले नाही
हॅप्पी फादर्स डे!
हॅप्पी फादर्स डे
आपलं दु:ख मनात ठेवून
घरातील सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी
धडपडणार्या प्रत्येक बापाला
फादर्स डे च्य निमित्ताने सलाम
हॅप्पी फादर्स डे
19 जून 1910 साली पहिल्यांदा फादर्स डे साजरा केला होता. Sonora Dodd यांनी फादर्स डे चं सेलिब्रेशन सुरू केले होते. Sonora Dodd चे वडील William Jackson Smart हे सिंगल पेरंट होते. त्यांनी सहा मुलांना वाढवलं. Sonora Dodd यांनी मदर्स डे सेलिब्रेशन बद्दल ऐकलं मग त्यांना त्याच आधारावर फादर्स डे सेलिब्रेट करण्याला सुरूवात केली.
दरम्यान जगभरात वेगवेगळ्या दिवशी फादर्स डे सेलिब्रेट करण्याची पद्धत आहे. मार्च, एप्रिल, जून महिन्यात फादर्स डे साजरा करतात.