दिल्लीमध्ये शव्वालचा चंद्र न दिसल्याने 3 मे रोजी ईद-उल-फित्र साजरी होणार आहे. मरकझी रयत ई हिलाल कमिटीने याबाबत माहिती दिली आहे.
Eid Moon Sighting 2022, Chaand Raat Live News Updates: दिल्लीमध्येही दिसला नाही शव्वालचा चंद्र; 3 मे रोजी साजरी होणार ईद
आता रमजानचा महिना निरोप घेण्याची वेळ आली आहे. 28 रोजे पूर्ण झाले असून, 29 वा रोजा आज म्हणजेच रविवारी आहे. रविवारी 29 एप्रिल रोजी रमजानला चंद्र दिसला तर सोमवारी ईद साजरी केली जाईल. मात्र रविवारी चंद्रदर्शन न झाल्यास सोमवारी चंद्र रात्र असेल आणि मंगळवारी ईद साजरी केली जाईल. ईद हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण आहे. पवित्र रमजान महिन्यानंतर हा सण शांतता आणि बंधुभावाचा संदेश घेऊन येतो. ईदच्या दिवशी खास नमाज अदा केली जाते, नवीन कपडे परिधान केले जातात. यादिवशी शांती आणि सद्भावानेसाठी प्रार्थना केली जाते.
पश्चिम देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरचे अनुसरण केले जाते, तर इस्लामिक कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे. याचा अर्थ त्याचे दिवस, तारखा आणि सण चंद्राच्या दर्शनावर आधारित आहेत. त्यामुळे दरवर्षी, रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्र साधारणतः 10-11 दिवस आधी येतात, जे विशिष्ट ईदचा चंद्र कधी दिसते यावर अवलंबून असते. रमजानचा संपूर्ण महिना आनंद आणि उत्साहाने भारलेला असतो. हा महिना चंद्रदर्शनाने समाप्त होतो. आखाती देशांमध्ये (UAE, Bahrain, KSA, Qatar, Kuwait) हे चंद्र दर्शन रविवारी होऊ शकते.
या वर्षी, ईद-उल-फित्र 2 मे रोजी पडण्याची अपेक्षा आहे आणि सौदी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मुस्लिमांना शनिवारी रात्री, 30 एप्रिल 2022 रोजी शव्वालचा ईदचा चंद्र पाहण्याचे आवाहन केले आहे, जो रमजान 29 1443 AH असेल. सौदी प्रेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, जो कोणी उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीने शव्वाल ईदचा चंद्र पाहिलं त्याने जवळच्या न्यायालयात याची माहिती दिली पाहिजे.