Eid Moon Sighting 2021: ईदचा चंद्र दिसला नाही, 14 मे रोजी साजरी होणार  ईद उल फितर
Eid Moon Sighting | Representational Image (Photo Credits: pixabay)

इबादतचा महिना असलेल्या रमजाना 27 वा रोजा सोमवारी पूर्ण झाला. आता सर्वांना उत्सुकता होती ती आकाशातील चंद्र दिसण्याची. ज्याला 'ईद का चांद' (Eid Ka Chand) म्हटले जाते. संपूर्ण भारतातून ईदचा चांद पाहण्यासाठी ईस्लाम धर्मीय बांधवांनी आकाशाकडे डोळे लावले होते. बुधवारी सायंकाळपर्यंत ईदसाठी चंद्रदर्शन झाले नाही. मरकजी चांद कमिटीही आकाशाकडे डोळे लावले होते. परंतू, त्यांनाही ईदचा चंद्र दिसला नाही. त्यामुळे मरकजी चांद कमेटीनेही सायंकाळी चंद्रदर्शन न झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे काही बांधवांनी 30 दिवस रोजा राहिल्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, येत्या शुक्रवारी (14 मे) ईद उल फितर (Eid al-Fitr) साजरी होईल असे, इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया फरंगी महल लखनऊ (Maulana Khalid Rasheed Farangi Mahali) यांनी म्हटले आहे.

रमजानचा आज 29 वा रोजा पार पडला. अज अनेकांना अपेक्षीत होते की, आज माहे शव्वाल म्हणजेच ईदचा चंद्र नजरेस येईल. परंतू असे झाले नाही. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊस अनेक ठिकाणी चंद्र दर्शन होते का हे पाहिले जात होते. परंतू, चंद्र दर्शन झाल्याचे वृत्त कुठूनही आले नाही. त्यामळे आता 14 मे रोजी ईद साजरी केली जाणार आहे. 13 मेर रोजी रमजानचा 30 वा रोजा ठेवला जाणार आहे.  (हेही वाचा, Eid al-Fitr 2021 In Guidelines Maharashtra: कोरोना काळात इद उल फित्र बाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी)

दरम्यान, देशात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यामुळे केंद्र आणि देशातील सर्व राज्य सरकारांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश आणि अवाहन नागरिक आणि प्रशासनाला केला आहेत. खास ईद निमित्तही विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया फरंगी महल लखनऊ यांनी म्हटले आहे.