Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Eid 2020 Moon Sighting in Maharashtra Highlights in Marathi: मुंबई मध्ये उद्या 30 वा रोजा, 25 मे दिवशी रमजान ईद; हिलाल कमिटीची घोषणा

लाइफस्टाइल Dipali Nevarekar | May 23, 2020 08:28 PM IST
A+
A-
23 May, 20:28 (IST)

मुंबई मध्ये उद्या (24 मे) दिवशी  30 रोजे पूर्ण करून  25 मे दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मुंबई प्रमाणेच महाराष्ट्र आणि भारतामध्येही सोमवारी ईद साजरी होईल. दरम्यान केरळ  आणि कर्नाटकामध्ये उद्या ईद  आहे. 

23 May, 20:15 (IST)

 Sunni Ruet Hilal committee ने आज शव्वाल चंद्रकोरीचे  दर्शन न झाल्याने मुंबाई मध्ये 25 मे दिवशी Eid-al-Fitr साजरी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

23 May, 20:07 (IST)

औरंगाबाद, नाशिक, पुणे सह मुंबईत शव्वाल चंद्र दर्शन अद्याप न झाल्याने ईद 25 मे ला साजरी होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांकडून सोमवारी सरकारी नियमांचे पालन करत आणि गळाभेट टाळून सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवत ईद साजरी करण्याचं आवाहन  

23 May, 19:51 (IST)

महाराष्ट्रात अद्याप शव्वाल चंद्रकोरीचे दर्शन कुठेच झालेले नाही. दरम्यान नाशिक मध्ये लोकं ती पाहण्याचा प्रयत्न आहेत. आज चंद्रकोर दिसल्यास उद्या रमजान ईद साजरी केली जाऊ शकते. चंद्रकोरीचं दर्शन न झाल्यास 30 दिवसांचे रोजे पूर्ण करून सोमवार, 25 मे दिवशी रमजान ईद साजरी होणार  आहे. 

23 May, 19:31 (IST)

महाराष्ट्रात अद्याप चंद्र दर्शन झालेले नाही. विविध भागत लोक शव्वाल चंद्रकोर पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. 

23 May, 18:52 (IST)

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहराबाबत सूर्यास्तानंतर म्हणजेच सुमारे 7 नंतर शव्वाल चंद्रकोरी बाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रमजान ईद तारीखेच्या अपडेट्स बद्दल सारी माहिती झटपट मिळण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या. 

23 May, 18:40 (IST)

महिन्याभरापूर्वी सुरू झालेला रमजान महिना आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. पुणे शहरातही आज 29 वा रोजा आहे. इस्लामिक कॅलेंडर चंद्रकोरीच्या दर्शनावर अवलंबून असल्याने आज रमजानचा शेवटचा दिवस असू शकतो. 

23 May, 18:19 (IST)

मुंबई सह महाराष्ट्रात आज 29 वा रोजा असल्याने चंद्र दर्शन होऊ शकतं. मात्र त्याची अधिकृत घोषणा हिलाल कमिटी 7 वाजल्यानंतर करण्याची शक्यता आहे. 

23 May, 17:59 (IST)

आज सायंकाळी 7 नंतर महाराष्ट्रात सूर्यास्तानंतर  हिलाल कमिटी संध्याकाळी 7 नंतर शव्वाल चंद्रकोरी बाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 

23 May, 17:23 (IST)

आज महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम बांधवांचं शव्वाल चंद्र दर्शन आणि रमजान ईदच्या तारखेकडे लक्ष लागले आहे. मगरिबची नमाज अदा झाल्यानंतर मुंबई, नाशिक, औरंगाबाद सह महाराष्ट्र मध्ये हिलाल कमिटी त्याबाबत घोषणा करू शकते.   

आज भारत देशातील तमाम मुस्लिम बांधवांचे लक्ष हे Moon Sighting Committees च्या चंद्र दर्शनानंतर दिल्या जाणार्‍या निर्णयाकडे आहे. आज भारतात यंदा रमजान ईद कधी साजरी केली जाणार? याचा निर्णय हिलाल कमिटीकडून दिला जाणार आहे. आज भारतामध्ये 29 वा रमजानचा रोजा आहे. आज चंद्र दर्शन झाल्यास Eid Al-Fitr चा म्हणजेच रमजान ईदचं सेलिब्रेशन उद्या (24 मे) दिवशी होईल. जर चंद्र दर्शन झाले नाही तर 30 दिवसांचा रोजा संपूर्ण करून भारतामध्ये 25 मे, सोमवारी रमजान ईद साजरी केली जाऊ शकते. मग यंदाच्या रमजान ईद बद्दल तुमच्या मनातही उत्सुकता असेल तर मगरीबच्या प्रार्थनेनंतर पहा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सह महाराष्ट्रामध्ये 'चांद रात' बाबत हिलाल कमिटी काय निर्णय देते? Chand Raat Mubarak 2020 Greetings: चांद रात मुबारकच्या शुभेच्छा Wishes, Messages, Greetings, GIF Images, HD Wallpapers च्या शेअर करून खास करा तुमच्या मुस्लिम मित्र- मैत्रिणींचा यंदाचा ईदचा सण

भारतामध्ये दिल्ली, हैदराबाद, उत्तरप्रदेश प्रमाणेच आज महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर मध्ये मुस्लिम बांधवांचे संध्याकाळी चंद्र दर्शनाकडे लक्ष असेल. रमजानच्या शेवटच्या जुम्माच्या रात्री सौदी अरेबिया सह अनेक आखाती देशांमध्ये ईदची तारीख ठरवण्यासाठी प्रयत्न केले गेले मात्र त्यांना चंद्र दिसलेला नाही. तेथे 30 दिवसांचा रोजा पूर्ण करून ईद साजरी केली जाईल.

सध्या जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असल्याने मुस्लिम बांधवांबा यंदा ईदचा सण साध्या पद्धतीने आणि घरातच्याघरातच साजरा करण्याचं आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचं संकट पाहता यंदा घरीच नमाज अदा करण्यास सांगण्यात आलं आहे.


Show Full Article Share Now