Dry Days | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राष्ट्रपीता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non-Violence) यामुळे 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत भर ड्राय डे (Dry Day Across India) असणार आहे. त्यामुळे हॉटेल, पब्ज आणि रेस्तरॉंमध्ये मद्यविक्री करण्यावर बंदी असेल. याशिवाय देशी दारुचे दुकान आणि इतरही मद्यविक्री दुकानांमध्ये दारु मिळणार नाही. ड्राय डे (Dry Day) असल्याने पूर्ण दिवसभर दारुविक्री बंद असणार आहेत. संपूर्ण वर्षभरातील काही विशिष्ट दिवशी 'ड्राय डे' पाळला जातो. जसे की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्या दिन. या दिवसांमध्ये 2 ऑक्टोबरचाही समावेश आहे. या दिवशी गांधी जयंती असते.

अलिकडच्या काळात जगाला अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश देणारा महात्मा म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते. त्यांची जयंती (Gandhi Jayanti 2021) देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. लोक त्यांना बापूजी म्हणत असत. त्यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. या दिवशी देशभरातील दुकाने, बार आणि हॉटेल्समध्ये दारू विक्रीवर बंदी आहे. हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. (हेही वाचा, List of Dry Days 2021 in India: या दिवशी तुम्हाला देशात कुठेच दारु मिळणार नाही; पाहा तारखेसह संपूर्ण यादी )

यंदाच्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2021 मध्ये गांधी जयंती ही शनिवारी येत आहे. या वर्षी संपूर्ण भारत आणि जगभरातील अनुयायी महात्मा गांधी यांची 152 वी जयंती साजरी करतील. संयुक्त राष्ट्र महासभा (United Nations General Assembly) द्वारा 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non-Violence) म्हणून साजरा केला जातो. थोर वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी उद्गार काढले होते की, काही वर्षांनी मानवाला प्रश्न पडेल की खरोखरच महात्मा गांधी यांच्यासारखा महामानव पृथ्वीतलावावर जन्माला आला होता.