
Gudi Padwa 2025 Rangoli Designs: चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढी पाडव्याचा (Gudi Padwa 2025) सण साजरा केला जातो. या दिवसाला प्रतिपदा किंवा उगादी असेही म्हणतात. या वर्षी गुढी पाडवा 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याचा सण नवीन वर्षाचे प्रतीक मानला जातो. वसंत ऋतूची सुरुवात, नवीन कापणीचा आनंद आणि नवीन वर्षाचे स्वागत करणारा हा सण महाराष्ट्र आणि इतर काही प्रदेशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी घरे खास सजवली जातात आणि घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वस्तिक व रांगोळीने सजवले जाते. जर तुम्ही देखील गुढीपाडव्याच्या दिवशी आपले घर, अंगण रांगोळीने अधिक आकर्षित करणार असला तर आम्ही तुमच्यासाठी काही खास गुढीपाडव्यासाठी रांगोळी डिझाइन्स (Gudi Padwa 2025 Rangoli Designs) घेऊन आलो आहोत. खालील व्हिडिओज पाहून तुम्ही यंदाच्या गुढीपाडव्याला स्पेशन गुढी असणारी रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. (हेही वाचा - Gudi Padwa 2025 Rangoli Designs: गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीजवळ, घरोसमोर आणि अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाइन्स (Watch Video))
गुढीपाडवा रांगोळी डिझाइन्स, व्हिडिओ -
गुढीपाडव्याचा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. या दिवशी घरांमध्ये रंगीबेरंगी गुढी बसवल्या जातात आणि संपूर्ण कुटुंबासह स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.