Gudi Padwa 2025 Rangoli Designs: गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीजवळ, घरोसमोर आणि अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
प्रत्येत हिंदू सणाला रांगोळीचे विशेष महत्त्व असते. गुढीपाडव्या सणाला गुढीभोवती, घरासमोर आणि अंगणात खास रांगोळी काढली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडव्यासाठी काढायच्या खास रांगोळी डिझाइन्स (Gudi Padwa 2025 Rangoli Designs) घेऊन आलो आहोत.
Gudi Padwa 2025 Rangoli Designs: गुढी पाडवा (Gudi Padwa 2025) हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी गुढी पाडवा 30 मार्च रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडवा हा मराठी नववर्ष (Marathi New Year 2025) म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी लोक आपले घर स्वच्छ करतात आणि रांगोळी आणि फुलांनी सजवतात. तसेच ते नवीन कपडे घालतात आणि पारंपारिक जेवण बनवतात. गुढी पाडव्याच्या दिवशी लोक गुढी उभारतात. जे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
प्रत्येत हिंदू सणाला रांगोळीचे विशेष महत्त्व असते. गुढीपाडव्या सणाला गुढीभोवती, घरासमोर आणि अंगणात खास रांगोळी काढली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडव्यासाठी काढायच्या खास रांगोळी डिझाइन्स (Gudi Padwa 2025 Rangoli Designs) घेऊन आलो आहोत. (हेही वाचा - Gudi Padwa 2025 Mehndi Designs: हिंदू नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त हातावर काढा 'या' सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्स (Watch Video))
गुढी पाडव्यासाठी खास रांगोळी डिझाइन्स व्हिडिओ -
गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालण्याची परंपरा आहे. या दिवशी तुम्ही फुलांचे तोरण आणि रांगोळीने तुमचे घर सुशोभित करू शकता. गुढी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा छतावर ठेवली जाते. या दिवशी लोक पारंपारिक पदार्थ बनवतात.
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2025 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

