Happy Teachers' Day 2020 Quotes: भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांचा आज जन्मदिवस! भारतामध्ये त्यांच्या जयंतीच्या औचित्याने, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन (Teachers' Day) म्हणून साजरा केला जातो. गुरू पौर्णिमेप्रमाणेच शिक्षक दिनाच्या दिवशी देखील आपल्या शालेय जीवनापासून विविध टप्प्यावर कधी मार्गदर्शक, कधी सखा तर प्रसंगी टीकाकार म्हणून असलेल्या शिक्षक रूपी व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. शाळा-कॉलेजेसमध्ये ज्ञानदानाचा वसा चालवणार्या आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्या व्यक्तींबद्दल आदरभाव व्यक्त केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देखील ज्ञानदानाचं भरीव काम केलं आहे. मग आज त्यांच्या जयंती निमित्त शिक्षकातील समाजातील स्थान अधोरेखित करणारे काही मोलाचे विचार (Dr Sarvepalli Radhakrishnan Quotes) WhatsApp, Facebook, Instagram, Twitter वर शेअर करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (Happy Teachers Day) देत आजचा दिवस शिक्षकांसाठी थोडा स्पेशल बनवूया.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन पुढे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी करून 40 वर्ष ज्ञानदान केले. शिक्षणतज्ञ म्हणून काम केल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेतला. पहिल्यांदा स्वतंत्र्य भारताचे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले तर नंतर दुसरे राष्ट्रपती म्हणून काम केले.
सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे बहूमोल विचार
शिक्षक ही देशातील सर्वात बेस्ट मनं असायला पाहिजेत
शांतता ही राजकीय किंवा आर्थिक बदलाने नाहीतर मानवी स्वभावातील बदलाने मिळते
पुस्तक असं एक माध्यम आहेत ज्यांच्यामार्फत अनेक संस्कृतींमध्ये पूल बांधण्याचं काम होतं
जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला सारं ठाऊक आहे तेव्हा आपण शिकणं थांबवतो
खरा शिक्षक तोच आहे जो आपल्याल्या आपल्याबद्दल विचार करायला शिकवतो
Happy Teachers' Day GIFs
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक होते. शिक्षकी पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. देश घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे त्याचा गौरव, सन्मान राखणं गरजेचे आहे. आज शिक्षक दिना निमित्त तुम्ही देखील काही जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती तुमचा आदरभाव व्यक्त करायला विसरू नका.