Dr Babasaheb Ambedkar's Birth Anniversary Chaityabhoomi Live Streaming: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण; 'या' ठिकाणी अनुभवा Online सोहळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Photo Credits: Wikimedia Commons)

'आधुनिक भारताचे निर्माते’, ‘महामानव’, ‘भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार’, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची जयंती 14 एप्रिल, 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. बाबासाहेबांची ही 130 वी जयंती असणार आहे. सध्या कोविड-19 (Coronavirus) च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अति संसर्गजन्य परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता, या वर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीदिनी चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मिडियाद्वारे करण्यात येणार आहे.

दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमतात. तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 8.00 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मुंबई चैत्यभूमी कार्यक्रमाचे,

यूटयूब – https://www.youtube.com/channel/UCSfiUdOk9Gi2X8FZxoT4Znw

फेसबूक – https://www.facebook.com/MyMumbaiMyBMC/

व ट्विटर – https://twitter.com/mybmc द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे. त्यामुळे आज दादर येथे गर्दी न करता घरीच बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.

या वर्षी कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता, दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत. परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एका वेळी पाच पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सँनिटायझर इत्यादी) पालन करून जयंती साजरी करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी Images, WhatsApp-Facebook Status, Messages, Wishes च्या माध्यमातून शेअर करा त्यांचे काही प्रेरणादायी विचार)

कोविङ-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कदारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असे आवाहन केले आहे.