
Dr. Babasaheb Ambedkar Marathi Quotes: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 14 एप्रिल रोजी 129 वी जयंती आहे. दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी परिसरात दर्शनासाठी येतात. अनेक ठिकाणी या दिवशी मोठमोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वांनी आपापल्या घरीच भीमजयंती साजरी करावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यंदा मात्र याच निमित्ताने आपण एका वेगळ्या प्रकारे भीमजयंती साजरी करू शकता. आपणास माहीतच असेल की, बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात समता, शिक्षण, स्त्री उन्नती, स्वातंत्र्य या सर्व मुद्द्यांना धरून काम केलं, त्यांचे हे काम आणि त्यातून त्यांनी मांडलेले विचार आपण यंदा भीमजयंतीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता. यंदाच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही तयार केलेले हे Images स्वरूपातील विचार Whatsapp Status, Facebook किंवा अन्य सोशल मीडियातून आपल्याला शेअर करता येतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
- जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो

- शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

- शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

- आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

- बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

- माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप होते.

- जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

- हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

- शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती द्यायची झाल्यास, आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता, त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवत आयुष्यभर दिन दलितांची आदर्श रित्या सेवा केली. बाबासाहेबांचे भारताला मिळालेले सर्वात मोठे योगदान म्हणजे भारतीय संविधान. म्हणूनच त्यांना संविधानाचे शिल्पकार म्ह्णूनही ओळखले जाते. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्तव असणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार आत्मसात करून यंदा त्यांना अभिवादन करूयात!